आमचं ठरलंय…

आमचं ठरलंय, आमचं ठरलंय, असे म्हणत

महाराष्ट्रात विधानसभेसाठी भाजपा-सेनेने केलेली युती ही कार्यकर्त्यांच्या पचनी न पडल्याने, दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी ठिकठिकाणी बंडाचे निशाण फडकवल्याने अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संयुक्त पत्रकार परिषदेत युती झाल्याचे जाहीर करावे लागले. तसेच बंडखोरांना महायुतीत कोणतेही स्थान असणार नाही, असा इशाराही द्यावा लागला. स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याचा दोन्ही पक्षांनी गेल्या पाच वर्षांत वारंवार उच्चार करून, इच्छुकांना तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे राज्यभरातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते स्वबळाच्याच तयारीत होते. मात्र, विधानसभेसाठी युतीवर पहिल्यांदा पत्रक काढून, इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत, भाजपा-सेनेने महायुतीवर मोहोर उमटवली.

महाराष्ट्रात भाजपा-सेना सरकार सत्तेवर असून, गेल्यावेळी सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात प्रचार करून, दोन्ही पक्षांनी मिळून सत्तास्थापनेसाठी आवश्यक ते संख्याबळ गाठले होते. भाजपा १२३, तर सेना ६४ जागांवर विजयी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम, कणखर, निडर नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केंद्र सरकार करत आहे. त्या पुण्याईवर अपेक्षेप्रमाणे लोकसभेत पुन्हा एकदा भाजपा सरकार निवडून आले. रालोआ प्रणित आघाडी ३५० पेक्षा जास्त जागांवर विजयी झाली, तर भाजपाने ३०० चा आकडा पार केला. मात्र, राज्यात परिस्थिती पूर्णपणे विपरित आहे. सरकारविरोधात नाराजी आहे. बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, वरळी सागरी मार्ग, आरेतील मेट्रोच्या कारशेडला ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला सर्वपक्षीय विरोध (मेट्रो ही व्हायलाच हवी, याबाबत दुमत नाही. पर्यावरणाच्या नावाखाली गळे काढणाऱ्यांनी आरेत जेव्हा अलिशान निवासी संकुल उभारले गेले, तेव्हा मौन का बाळगले, हा वेगळा प्रश्न आहे.), ईडीने राष्ट्रवादीच्या शरद पवारांविरोधात बजावलेली नोटीस, त्यामुळे क्षुब्ध झालेले जनमत याचा विचार व्हायलाच हवा. असो.

या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी स्वबळावरच निवडणुकांना सामोरे जाणे इष्ट ठरले असते. काँग्रेस-राष्ट्रवादीने गेल्या वेळची चूक लक्षात घेत, यंदा आघाडी स्थापन करून, युतीच्या उमेदवारांसमोर आव्हान देण्याचा किमान प्रयत्न केला आहे. मात्र, स्वबळाचा नारा देत, भाजपाने तब्बल २० आमदारांचे तिकीट कापून, मोठ्या प्रमाणात नाराजी ओढवून घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून झालेल्या मेगाभरतीतील अनेकांची लॉटरी लागलेली असताना, पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची जी कोंडी करण्यात आलेली आहे, ती अनाकलनीय अशीच आहे. महाराष्ट्रासाठी भाजपाने १५०+ चा नारा दिला होता. प्रत्यक्षात भाजपा १५० जागाच लढवत आहे. भाजपाचे सर्वच्या सर्व १५० उमेदवार निवडून येतील, असा दावा भाजपाचे शिर्षस्थ नेतृत्वही करणार नाही. प्रकाश मेहता, विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असू शकतो. त्याची जबाबदारीही त्यांच्यावरच राहील. मात्र, आयात उमेदवारांसाठी निष्ठावान कार्यकर्त्यांची उपेक्षा का केली गेली? याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावेच लागेल. विद्यमान आमदारांचे तिकिट कापल्याने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सेनेतही फारशी वेगळी परिस्थिती नाही.

सर्वसामान्य जनतेची स्मरणशक्ती अत्यल्प असते, असे म्हटले जाते. मात्र, मोदी सरकारने जे काही काम केले आहे, ते सणसणीत असेच आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सीमेपार जात केलेला सर्जिकल स्ट्राईक असो, वा पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केलेले एरियल स्ट्राईक असो. तसेच जम्मू-कश्मीरचे वादग्रस्त ३७० कलम हटवणे असो, देशभरातील जनता त्याबद्दल नरेंद्र मोदी यांची ऋणीच राहील. मात्र, विधानसभेला स्थानिक विषयांना मतदार प्राधान्य देतो. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना जनतेसमोर आपण काय कामे केली, याचा हिशेब द्यायचा आहे. मोदी सरकारच्या योजना आपल्या म्हणून ते मांडू शकणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानबरोबर करार करून अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन देशात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला. दुर्दैवाने त्यालाच सर्वाधिक विरोध महाराष्ट्रातून झाला. फडणवीस यांनी भाजपाचा मुख्यमंत्री या नात्याने, देशाच्या पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद पणाला लावायला हवी होती. मात्र, तसे त्यांनी केले नाही. सेनेने केलेला विरोध त्यांनी फारच गांभीर्याने घेतला. त्याचवेळी नागपूरला मुंबईशी जोडणारा समृद्धी महामार्गाचा प्रकल्प मात्र त्यांनी तत्परतेने मार्गी लावला. नागपूर येथे मेट्रोची फारशी गरज नसताना, ती उभारण्यात आली, धावूही लागली, पुरेशा प्रवाशांअभावी ती बंदही राहू लागली. देशाच्या आर्थिक राजधानीत मात्र अद्याप मेट्रोचे काम पूर्ण व्हायचेच आहे. याच मेट्रोच्या कारशेडसाठी आरे येथील जमीन संपादनाला विरोध करण्याचे सर्वपक्षीय कारस्थान आखले गेले. पर्यावरणाच्या नावाखाली त्याला न्यायालयात आव्हान दिले गेले. सेनेच्याच आदित्य ठाकरे यांनी आरेतील एकही झाड तोडू देणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, आज तेथील झाडे तोडण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच ईडीच्या नोटीसीप्रमाणेच आरे कारशेडचेही टायमिंग चुकले का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

पुण्यातील कार्यक्षम आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेली उमेदवारी हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाला. मेधाताई यांनी कोथरुडकरांना भाजपासाठीच मतदान करण्याचे आवाहन, त्या भाजपाच्या मुशीत तयार झालेल्या कट्टर कार्यकर्त्या आहेत, याची साक्ष देणारे आहे. मात्र, सांगली-कोल्हापूर येथील भीषण पूरपरिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला आलेले अपयश चंद्रकांत पाटील यांना कोथरुड सारख्या सुरक्षित मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यास भाग पाडते झाले, हे वास्तव नाकारता येत नाही.

महाराष्ट्रातील लढतींचे स्वरूप ७ तारखेला स्पष्ट होईल. महायुती विरोधात आघाडी अशा थेट लढती प्रत्यक्षात असल्या, तरी अनेक मतदारसंघात भाजपा-सेना इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांचे उपद्रवमूल्य नाकारता न येणारे, असेच आहे. भाजपा जास्तीतजास्त १५० जागांवर विजयी होऊ शकते. पैकीच्या पैकी जिंकल्या तरी. म्हणजेच १२३ ते १५० हा प्रवास फारसा काही उत्साहवर्धक नाही. केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता असताना. महाराष्ट्रात भाजपाने सेनेशी केलेली युती ही राजकीय आत्महत्या आहे, असे आम्ही म्हणालो होतो. बंडखोरीची तीव्रता पाहताना, याचे स्मरण होणे, अत्यंत स्वाभाविक आहे. आमचं ठरलंय, असे फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही सांगितलेले आहे. जनतेने काय ठरवले आहे, ते निकालानंतर स्पष्ट होईलच. असो.

संजीव ओक

खंडणीखोर

अखेर ज्याची भीती होती तेच झाले. पर्यावरणाच्या नावाखाली खंडणी वसुलीचा परवाना देणारा प्लास्टिकबंदीचा निर्णय राज्यात घेण्यात आला आहे. त्याचवेळी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेले आहेत. हा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आलेला असला, तरी त्यातील त्रुटी कायम आहेत. जनतेला तसेच आस्थापनांना सक्षम पर्याय न देता तो लादण्यात आलेला आहे. तीनच दिवसांत राज्यभरात याचा फटका सामान्यांना बसला असून, मुख्यतः हॉटेल, मिठाई दुकाने तसेच किराणा दुकानदार यांच्यावर चुकीच्या पद्धतीने दंडाची आकारणी करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

प्लास्टिक बंदीबाबत सामान्य जनतेच्या मनात संभ्रम आहे. सहा महिने जनजागृतीसाठी देण्यात आले होते, असा दावा पर्यावरणमंत्री करतात. तर मग सामान्यांसह दुकानदारांनाही पर्यायांची माहिती का नाही? खानावळीतून पोळी-भाजी पार्सल कसे न्यायचे? स्टीलची भांडी नोकरदारांनी सोबत घेऊन फिरायची का? मंत्रालयाजवळ असलेल्या एक्स्प्रेस टॉवर, फोर्ट या भागात लाखोंनी मुंबईकर नोकरीसाठी येतात. दुपारी जेवणासाठी हातगाडीवरचे पार्सल हाच त्यातील बहुतांश नोकरदारांचा आधार असतो. डबेवाला लावणे प्रत्येकाला परवडत नाही. तसेच रोज डबा घेऊन येणाऱ्यांनाही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बाहेरून पार्सल आणावेच लागते. मग ते गाडीवरले असेल किंवा हॉटेलमधून मागवलेले. याला पर्याय काय आहे? मिठाई दुकानात पापडीपासून शेवेपर्यंत सर्व गोष्टी प्लास्टिकमध्येच ठेवाव्या लागतात. याला पर्याय काय?

निर्णयाच्या पहिल्याच दिवशी संबंधितांनी दुकानात घुसून दंडाच्या पावत्या फाडल्या. दहशत बसवली गेली. म्हणजेच पहिली पावती फाडली की दुसरी पावती न फाडण्यासाठीची तरतूद केली गेली काय? निर्णय राज्य सरकारचा आहे, तर मग त्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर का? स्थानिक हितसंबंध जोपासण्यासाठी या निर्णयाचा वापर करण्यात येणार आहे का? पुण्यात तर महापौर मुक्ता टिळक यांनी लगेचच ‘प्लास्टिक बंदीची कारवाई करताना पालिकेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी ‘सुट्टी’च्या दिवशी कारवाई करू नये,’ अशा सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. ‘सुट्टीच्या दिवशी तसेच चुकीच्या पद्धतीने कोणीही कारवाई करत असेल तर व्यावसायिकांनी त्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे आणि घनकचरा विभागाच्या प्रमुखांकडे करावी,’ असेही टिळक यांनी स्पष्ट केले आहे.

ही गंभीर बाब आहे. सुट्टीच्या दिवशी कारवाई करू नये, म्हणजे या दिवशी प्लास्टिक वापराला परवानगी आहे का? तसेच पालिका प्रशासन म्हणजे नेमके कोणाकडे तक्रार करायची? संबंधितांचे दूरध्वनी क्रमांक ठळकपणे का दिले गेले नाहीत? जनजागृती करताना या निर्णयामागील अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी काय तरतूद केली गेली?

प्लास्टिक बंदी ही व्हायलाच हवी. मात्र, आम्ही मागेच म्हटलेले होते. तुम्ही दुकानातून दिली जाणारी एक पिशवी बंद करून काहीही साध्य होणार नाही. त्या एका कागदी किंवा कापडी पिशवीत प्लास्टिक वेष्टणातल्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात जाणार आहेत. ही बंदी केवळ राज्य सरकारने घातलेली आहे, केंद्र सरकारने नव्हे. त्यामुळे चहापासून साखरेपर्यंत, डाळीपासून तांदळापर्यंत, साबणापासून शॅम्पूपर्यंत सर्वकाही प्लास्टिकचे वेस्टन घेऊन विकले जाते. म्हणूनच घाव हा मुळावर घातला जाणे अपेक्षित आहे.

(प्लास्टिक बंदीबाबत 9 जानेवारी 2015 साली आम्ही मांडलेली भूमिकाः सविस्तर वाचा https://raajmat.wordpress.com/2015/01/09/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/)

राज ठाकरे यांचा विरोध
‘प्लास्टिक बंदीचा निर्णय घाईघाईत घेतलेला आहे. कोणताही पर्याय न देता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला मनसेचा विरोध असून प्लास्टिकला पर्याय मिळेपर्यंत लोकांनी सरकार किंवा पालिकेकडे दंड भरू नये,’ असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले असून, प्लास्टिक बंदी हा फार्स असून निवडणूक फंडासाठीच प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली असावी, अशी शंकाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. प्लास्टिक बंदीबाबत ते मनसेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकारांशी बोलत होते.

‘प्लास्टिक बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मौन का? प्लास्टिक बंदीचा निर्णय हा कोण्या एकाच खात्याचा आहे काय?,’ असा सवाल त्यांनी केला. एखाद्याला आलेला झटका म्हणजे सरकारचे धोरण होऊ शकत नाही, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे याचे नाव न घेता लगावलेला आहे. त्यावर ‘हे निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत होत असतात, ज्याचं नेतृत्व मुख्यमंत्र्यांकडे असतं. राज ठाकरे यांनी फक्त निवडणुका आणि पैसा दिसतो. काळं मांजर आडवं आलं तरी महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी होणारच,’ असे म्हणत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, याच कदमांनी हा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घ्यायला लावला असल्याने मनसेने याला विरोध केला आहे, असे म्हणत काकांना पुतण्याची भीती वाटू लागली आहे का? अशी विचारणा केली होती. कदमांना एका दिवसात आपण काय म्हणालो, याचा विसर पडू शकतो, आम्हाला नाही.  याच कदमांनी प्लास्टिक बंदी यशस्वी ठरणारच कारण तो नोटाबंदीसारखा कोणतीही पूर्वकल्पना न देता घेण्यात आला नसल्याचा दावा केला होता. मात्र नोटाबंदीमुळे कष्टकऱ्यांच्या हाताचे काम हिरावले गेले नव्हते. इथे ते होतेय. असो.

हा निर्णय यशस्वी ठरला तर श्रेय आदित्यचे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला तर मात्र त्याते खापर फडणवीस सरकारवर फोडायचे, असे रामदास कदम यांचे धोरण आहे काय? असा प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत. त्यामुळे प्लास्टिक बंदी हा फडणवीस सरकारने घेतलेला धोरणात्मक निर्णय आहे, का आदित्यच्या सांगण्यावरून सेनेच्या मंत्र्याने आग्रहाने घेतलेला हा निर्णय आहे? हे रामदास कदमांनी जाहीर करावे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नुकतेच एसटी महामंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलनावरून निलंबित केले होते. उद्धव ठाकरे यांनी मध्यस्ती करताच त्यांनी निलंबनाचा निर्णय मागे घेतला. म्हणजे सर्वच निर्णय हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलून घेतले जातात, असे नव्हे.

रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना प्लास्टिक बंदीबाबत न्यायालयाने तीन महिन्यांची अधिकची मुदत दिल्यानंतर प्लास्टिक बंदीबाबत जाहीरातीद्वारे प्रबोधन करण्यात आले होते, असे सांगून, प्लास्टिक बंदीचा निर्णय हा नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेण्यात आला नाही. त्यामुळे याची कल्पना नसेल, तर तो त्यांचा दोष आहे, असा टोला राज ठाकरे यांना लगावला होता. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घ्यायला लावल्याने मनसेने याला विरोध केला आहे, असे म्हणत काकांना पुतण्याची भीती वाटू लागली आहे का? असा चिमटाही कदमांनी राज यांना काढला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राज यांनी ‘निर्णय सरकारने घेतला असेल, तर उत्तर सरकारने द्यावं, रामदास कदमांनी नात्यावर भाष्य करु नये,’ अशा शब्दांत रामदास कदम यांना म्हणून खडे बोल सुनावले आहेत.

‘प्लास्टिक बंदी लागू करण्यापूर्वी सरकारने पर्याय द्यावा. बाजारात प्लास्टिकला पर्याय आल्यानंतर बंदी घालावी. जोपर्यंत पर्याय मिळत नाही, तोपर्यंत लोकांनी दंड भरू नये. आमचा या बंदीला शंभर टक्के विरोध आहे. पालिका आणि सरकारने आपली कामे करावीत. आहे त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, मगच धोरणे ठरवावीत. पालिकेने जबाबदारी झटकण्यासाठीच प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सरकारने नाकर्तेपणाचा दंड जनतेकडून वसूल करू नये,’ अशा शब्दांत राज यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहे.
‘प्लास्टिकने संपूर्ण आयुष्य घेरलं गेलं आहे. मग बंदी करायची तर सगळ्याच प्लॅस्टिकवर का बंदी का नाही? महाराष्ट्रातल्या बहुतांश नद्या प्रदूषित आहेत, त्याच्या स्वच्छतेविषयी पर्यावरणमंत्री जे बोलले त्याचं पुढे काहीच झाले नाही,’ अशा शब्दांत त्यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली. ‘प्लास्टिक बंदी हा जगाला भेडसावणारा प्रश्न आहे, त्यामुळे जगातील इतर देश नक्की काय करत आहेत याचा अभ्यास कोणी केलाय का? लोकांनी देखील जबाबदारीने वागलं पाहिजे तसंच सरकारने देखील जबाबदारीने वागलं पाहिजे. आधी शहरभर कचराकुंड्या बसवा, राज्यातल्या नद्या स्वच्छ करा आणि मग सरकारने एकदा त्यांची जबाबदारी नीट पार पाडली की मग तुम्ही नागरिकांना दंड आकारा. सरकार त्यांचे काम करत नाही, महापालिका त्यांना दिलेले काम करत नाही आणि दंड मात्र सर्वसामान्यांकडून घेतला जातो. प्लास्टिकला पर्याय देणार नसाल आणि तरीही लोकांना दंड आकारणार असाल, तर आमचा विरोध आहे,  मी लोकांना सांगेन दंड भरू नका,’ अशा शब्दांत राज यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच सामान्यांना त्रास होत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

राज यांनी थोरल्या पवारांची मुलाखत घेतल्यापासून सातत्याने मोदी तसेच फडणवीस सरकारविरोधात भूमिका घेतलेली आहे. आजही पत्रकार परिषदेत त्यांनी हेच धोरण राबवले असले, तरी यात त्यांनी प्लास्टिक बंदीचा प्रश्न उपस्थित करून सामान्यांच्या हिताचा विचार केला आहे. फडणवीस सरकारने एकतर सामान्यांना प्लास्टिकला समर्थ पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होता कामा नये. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्वच घटकांना खंडणीसाठी राजमान्यता दिल्याचा संदेश जाईल. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारनेच उचलावी. त्याचे पालन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले अधिकार मागे घेण्यात यावेत. अन्यथा गावागावातून नवे खंडणीखोर उदयास येतील… म्हातारी मेल्याचे दुःख नसते, काळ सोकावतो.

संजीव ओक

लुटून दाखवले…

uddhav_thackerayशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याची जाहीरसभेत अर्धवटराव अशी केलेली हेटाळणी, उद्धव हेच अर्धवट आहेत, हे पुन्हा एकवार दाखवून देणारी ठरली आहे. पारदर्शकतेच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांची चांगलीच पाचर मारून ठेवली आहे, म्हणूनच तोल गेलेले उद्धव बेताल व्यक्तव्य करत आहेत. मुंबई महापालिकेसारखी 37 हजार कोटींचे बजेट असणारी दुभती गाय हातातून जाण्याच्या धास्तीने ते आकांताने जाहीरसभातून जणूकाही आक्रोशच करत आहेत. गेल्या काही दिवसांतल्या राजकीय घडामोडींवर एक नजर टाकली तर उद्धव यांचा आटापिटा समजून येतो. केंद्र सरकारने पारदर्शक कारभारावरून एक अहवाल प्रकाशित केलाय. मुंबई पालिकेच्या कारभारात कोणतीही पारदर्शकता नाही, हे जगजाहीर आहे. कंत्राटदारांना पाठीशी घातले जाते, मर्जीतील ठेकेदारांना कामाचे ठेके मिळतात. रस्त्यांसाठीचा कोट्यवधी रुपयांचा निधी त्यामुळे दरवर्षी अक्षरशः खड्ड्यात जातो. दिवसाढवळ्या दादर येथील श्रीसिद्धीविनायक मंदिरासमोरील रस्ता खचल्याच्या घटनेला फारसा कालावधी झालेला नाही. 37 हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेचे ऑडिटच गेल्या सात वर्षांत झालेले नाही. म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेनेच्या ताब्यातील या पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढत, पारदर्शकता आणण्याची गरज विषद केली होती. ही पारदर्शकता अर्थातच उद्धव यांना झोंबल्याने त्यांनी केंद्राच्या अहवालाचा सोयिस्कर अर्थ काढत, जाहीरसभांमधून आमची कशी लाल, हे सांगण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. निवडणूकपूर्व एका सर्वेक्षणानुसार भाजपा शंभरापेक्षा जास्त जागांवर विजयी होणार, असा अंदाज आहे, तर उद्धव यांच्या सेनेला जेमतेम 66 जागाच मिळणार आहेत. तशातच मुलुंड येथील डंम्पिंग ग्राऊंडमध्ये गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. बेस्ट बसेस, खासगी चारचाकी वाहने, दुचाकी यांच्या नावावर हजारो टन कचरा उचलला जात असल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांचा मलिदा संबंधित कंत्राटदारांनी लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी एसआयटी करत असून, कचऱ्यातून कोणी किती कमावले, हे लवकरच उघड होईल. मुख्यमंत्र्यांनी जाहीरसभेतून उद्धव यांचा खोटारडेपणा उघड केल्याने, सैरभैर झालेल्या उद्धव यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली आहे.
wp-1460054373811.jpegउद्धव यांना राजकारण नाही, तर अर्थकारण साधायचे आहे, हे आता उघड झाले आहे. म्हणूनच विरोधी पक्ष ते थेट सत्तेतील सहभागी पक्ष अशी गुलाटी त्यांनी मारली. मात्र, सत्तेत सहभागी होऊनही खातीपिती खाती न मिळाल्याने, पहिल्या दिवसापासूनच त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली, हे सर्वश्रूत आहे. महापालिका निवडणुकीसाठी उद्धव यांनी युती अपेक्षेप्रमाणेच तोडली. विधानसभेवेळी जागा वाटपावरून शेवटपर्यंत घोळ घालत, भाजपाला बेसावध ठेवण्याचा त्यांचा डाव फसला होता. युती तोडली, पण सत्तेतून बाहेर न पडल्याने, माध्यमांसह विरोधकांनी त्यांच्या हेतूबाबत जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेव्हा मात्र त्यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांनी डंम्पिंग ग्राऊंडचा घोटाळा उघड करताच, रात्री दहा वाजता सेनेचे मंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलेसुद्धा. तेथे नेमके फडणवीस यांनी कोणत्या कळा फिरवल्या, याची माहिती मिळाली नाही, पण हे नेते बाहेर आल्यावर आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेलो होतो, राजीनामा खिशातच आहे, असे माध्यमांपुढे सांगते झाले. अरे, राजीनामा खिशात ठेवायचा नसतो, तो लगेचच द्यायचा असतो… बरे या मागण्या कोणत्या तर सेनेनेच त्यांच्या वचननाम्यात अडीच वर्षांपूर्वी दिलेल्या. गेली अडीच वर्षे काय झोपला होता… माजावर आलेल्या वळूला चाप लावतात म्हणे. फडणवीस यांनी असाच चाप लावला की काय…
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अशी अचानक कोल्हेकुई उद्धव यांनी का सुरू केली? काही संबंध आहे का? वास्तविक आचार्य अत्रे यांच्या मराठाने संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न लावून धरला होता. त्याच अत्रेंवर चिखलफेक करत, बाळासाहेबांनी त्यावेळी ही चळवळ हायजॅक केली होती. काँग्रेसी मदतीने सेनेचा वेल तगला, वाढला. म्हणूनच वसंतसेना असा उल्लेख आजही होतो. रायगड जिल्ह्यात काँग्रेससोबत युती करून, उद्धव यांनी सेना आजही काँग्रेसच्या सोबत आहे, त्याचे प्रमाण दिले आहे. खुद्द मुंबईत 42 जागी काँग्रेस व सेना एकमेकांना पुरक लढती लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असा नोटाबंदी निर्णय जाहीर करत, ब्लॅक मनीच्या विरोधात जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केला, त्यावेळी ज्या दोन-चार राजकीय पक्षांनी उघडपणे या निर्णयाविरोधात गळे काढले, त्यात उद्धवही आघाडीवर होते. देशातील सर्व विरोधी पक्ष या निर्णयाचे समर्थन करत असताना, पश्चिम बंगालमधील ममता, उत्तर प्रदेशमधील मायावती, तर सेनेचे उद्धव हे तिघेच नोटाबंदीमुळे सामान्यांचे जिणे हलाखीचे झाले असल्याचा आरोप करत मोदी यांच्यावर आगपाखड करत होते. त्याचवेळी ज्या सामान्यांचा हे दाखला देत होते, ती जनता मात्र मोदी यांच्या मागे ठामपणे उभी होती. मोदी तसेच गुजराती बांधवांच्यावर यथेच्छ टीका करून झाल्याने, मुंबईतील गुजराती समाज सेनेविरोधात आहे. म्हणून रात्री झोपेतही मराठी, मराठीचा जप करणाऱ्या उद्धव यांनी गुजराती हार्दिक पटेलला मुंबईत बोलावून घेतले, त्याचा पाहुणचार केला, त्याला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून घोषीतही केले. घ्या. इथे महाराष्ट्रात आपटून आपटूनही स्वबळावर सत्तेत नाही, आणि हार्दिकला करताहेत गुजरातचा मुख्यमंत्री…
तर चित्र असे आहे की, उद्धव यांना मुंबई हातातून जाऊ द्यायची नाहीय्ये, म्हणून सर्वाधिक जाहीरसभा ते मुंबईत घेताहेत. महाराष्ट्राशी त्यांना काडीचेही घेणेदेणे नाही. महाराष्ट्र, मावळा, मराठी हे फक्तwp-1452537420970.jpeg निवडणुकीत तोंडी लावायला. युवराज मात्र शिवाजी पार्क येथील उच्चश्रीमंतांच्या बॉम्बे स्कॉटिश कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणार, मावळ्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकायचे. उत्पन्नाचा कोणताही अधिकृत स्रोत नसताना, यांच्या नावावर अब्जावधी रुपयांची संपत्ती कशी? हा प्रश्न सामान्य सैनिकांनी विचारायचा नाही. त्याला बाळासाहेबांचे नाव घेऊन, शिवबंधनात अडकवून टाकायचे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची गेल्या अडीच वर्षांत यांना आठवण होणार नाही. निवडणुकीत आचारसंहिता लागू असताना मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत घोषणा करावी, असा हे आग्रह करणार. पुन्हा आम्ही मागणी केली, पण मुख्यमंत्र्यांना शेतकरी जगला काय, मेला काय याचे सोयरसुतक नाही, अशी ठोकठोक करायला हे मोकळे. बाकी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसी डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केलेली टीका तुम्हाला का झोंबली, याचे कारण समजू शकण्यासारखे. राज्यात तुम्ही काँग्रेसशी युती केलीत म्हणून हो. आपण मर्द असल्याचा हे वारंवार उच्चार करणार, पण सीमाभागातील जनतेला न्याय मिळावा, म्हणून प्रत्यक्ष बेळगावात जाऊन जाहीरसभेत कर्नाटक सरकारला जाब विचारण्याचा मर्दपणा हे दाखवणार नाहीत. कोल्हापूरी कुंपणावरून ते कर्नाटक सरकारला दंडाच्या बेंडकुळ्या फुगवून दाखवणार. सीमाप्रश्न अद्याप सोडवता आलेला नाही, आणि आता गोव्यातल्या जनतेला न्याय देणार म्हणे… जसा हार्दिक गुजरातचा मुख्यमंत्री तसाच हा प्रकार!!! मुंबईत पूर आला की, सेनाच मदतीला धावते, असा दावा करणारे 2005 मध्ये प्रलयंकारी पावसाने मुंबई ज्यावेळी वेठीस धरली, त्यावेळी उद्धव कलानगरमध्येच होते का कुठे? सेनाभवन ते बांद्रा या दरम्यान रात्री एकही सैनिक सामान्यांच्या मदतीला का नव्हता? याचे उत्तर कोणी मागायचे नाही. कोट्यवधी रुपयांची तरतूद पाण्याचा निचरा करण्यासाठीच्या पंपिंग स्टेशनसाठी केली असतानाही, थोड्याशा पावसानेही मुंबई का तुंबते, यातच उद्धव यांचा पारदर्शी ‘कारभार’ दडलेला आहे. मोदी यांनी मुंबईत यावे, असे जाहीर आव्हान उद्धव यांनी दिले आहे. तुर्तास तरी फडणवीस पुरेसे आहेत. प्रभादेवी येथे सेनेच्या मुखपत्रासमोरील जागेतच ते जाहीर सभा घेऊन, उद्धव यांच्या आरोपांना उत्तरे देणार आहेत. उद्धव फडणवीस बालेकिल्ल्यात घुसून उत्तरे देणार आहेत. तुमचे काय? खा. किरिट सोमय्या यांनी मालमत्तेबाबत तुम्हाला ललकारले आहे. बघू या…

संजीव ओक

गोबेल्सनिती

एखादी खोटी गोष्ट शंभरवेळा सांगितली गेली, की ती खरी वाटू लागते. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी नेमके हेच तंत्र Uddhav Thakareभाजपाविरोधात वापरले आहे. बालराजेंनी आखलेले मिशन 150+ यशस्वी करण्यासाठी युती तोडण्याचा निर्णय वसंतसेनेने घेतलेला असताना, त्याचे खापर मात्र त्यांनी भाजपावर फोडले. विधानसभा निवडणुकीतही ठाकरे आणि कंपनीने मतांचा जोगवा याच भावनिक आधारावर मागितला. आताही तेच सुरू आहे. अगदी दसरा मेळाव्यातही, “विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही गाफील राहिलो. मित्र मागून वार करेल असे वाटले नव्हते. मात्र, आता हिंमत असेल तर युती तोडून दाखवा, मग आमचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ काय आहे ते आम्ही दाखवून देऊ, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला अप्रत्यक्ष मान्यताच उद्धव यांनी दिलेली आहे. उद्धव यांनी महाराष्ट्र विधानसभेचा दाखला दिल्यामुळे, त्यावेळी नेमके काय घडले, हे पाहणे रंजक ठरेल. आसाम, पश्चिम बंगालसह झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी “मोठी ताकद सत्तेची व पैशांची लावूनही महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेची घोडदौड रोखता आली नाही. स्वबळावर सरकार स्थापन करता आले नाही,” असे वसंतसेनेने ज्या महाराष्ट्राबद्दल म्हटले आहे, तेथील विधानसभा निवडणुकीत नेमके काय घडले होते, हे सविस्तर समजावून घेऊ. लोकसभेत भाजपाला घवघवीत यश मिळूनही वसंतसेनेने त्यांना केवळ 119 जागा देऊ केल्या. भाजपाने 144 जागांची मागणी केली होती, नंतर त्यांनी ती मागे घेत केवळ 130 जागा मागितल्या. तितक्याही त्यांना देण्यास वसंतसेनेने नकार दिला. भाजपाला 119 तर युतीतल्या घटकपक्षांसाठी 18 जागा व स्वतःसाठी 151 जागा (बालराजेंनी मिशन 150+ आखले होते) ठेवल्या. युती तोडण्याचा निर्णय वसंतसेनेने निवडणुकीपूर्वीच घेतलेला होता. स्वतः उद्धव यांनी युती तुटण्याचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच तुळजापूर येथे जाऊन प्रचाराचा नारळे फोडताना, मिशन 150 यशस्वी करण्यासाठीचे आवाहन केले होते. मात्र, केवळ भाजपाला प्रचाराला तसेच उमेदवार निवडीसाठी वेळ मिळू नये, म्हणून अखेरपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ घातले गेले. दि. 25 सप्टेंबर 2014 रोजी युती अधिकृतपणे तुटली असली, तरी निवडणुकीचे निकाल काही वेगळेच चित्र मांडतात. भाजपाला 119 जागा देऊ करण्यात आल्या होत्या, तर भाजपा 122 जागांवर 27.8 टक्के मिळवत विजयी झाली. 150 जागा लढविण्याची संपूर्ण तयारी करून निवडणुकीला सामोरे गेलेल्या सेनेला केवळ 63 जागांवर समाधान मानावे लागले. तर त्यांच्या वाट्याला 19.3 टक्के इतकीच मते आली. विशेष म्हणजे 2009च्या निवडणुकीत भाजपा 46 जागांवर विजयी झाली होती, तर वसंतसेना 44 जागांवर. भाजपाने 119 जागा लढवताना, 46 जागा जिंकत 14.02 टक्के इतकी मते मिळवली होती. त्याचवेळी वसंतसेना मात्र 160 पैकी केवळ 44 जागाच जिंकू शकली. त्यांना केवळ 16.26 इतकाच जनाधार मिळाला होता. म्हणजेच भाजपाने 14.02 टक्क्यांवरून 27.8 टक्के इतकी मते जिंकत आपला बेस वाढवला. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र, अशी हाक घालत केलेला प्रचार भाजपाला महाराष्ट्रात सत्ता देता झाला. त्याची धास्ती उद्धव यांनी घेतलेली आहे काय? “पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, तर मुख्यमंत्री हे पूर्ण राज्याचे असतात. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाचा प्रचार करू नये,” असे त्यामुळेच तर त्यांनी म्हटले आहे काय? लोकसभेवेळी मोदी लाट देशभरात होती, असे मान्य केले तर सर्जिकल स्ट्राईकनंतर आता देशभरात मोदी त्सुनामी आहे, असे म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही. मुंबईत मोदी यांनी केवळ जाहीर सभा घेतली, तरी वसंतसेनेच्या उमेदवारांवर अनामत रक्कम गमावण्याची वेळ येईल. राज्यभरात निघणाऱ्या मराठा मोर्चाविरोधात व्यंगचित्र प्रकाशित करून, त्याबद्दल माफी मागण्यास काचकूच करणाऱ्या वसंतसेनेला मराठा टक्केवारीची काळजी लागल्यामुळेच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाची मागणी केली आहे. त्याचवेळी इतर आरक्षणांना धक्का न लावता ते देण्याचे धारिष्ट्य देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असा नथीतून तीर मारायला उद्धव विसरलेले नाहीत. मुंबईत युती तोडून पहा वगैरे वल्गना करणारी वसंतसेना प्रत्यक्षात भाजपाने ही युती तोडू नये, यासाठी अक्षरशः पाय धरले असल्याचे आम्ही मागेच म्हटले होते. भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसंतसेनेला आर्थिक रसद पुरविणारी मुंबई मनपा ही दुभती गाय त्यांना गमवणे परवडणारे नाही. म्हणूनच वारंवार वसंतसेना विधानसभेवेळी भाजपाने दगा दिला असे धादांत खोटे विधान वारंवार करत आहे. म्हणजेच मुंबई मनपा निवडणुकीवेळी युती तुटली, तर पुन्हा एकदा मित्राने पाठीत खंजीर खुपसला, दगा केला, असा कांगावा करत मतदारांसमोर कटोरी घेऊन भीक मागायला तोंड राहते. मुंबईतील घसरलेला मराठा टक्का, मोदी, शाह यांच्यावर टीका करण्याच्या नादात दुखावलेले गुजराती बांधव जे मुंबईत बहुसंख्य, उरी येथे पाकने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या आधारे लष्कराने पाकमध्ये घुसून दहशतवादी तळांसह दहशतवाद्यांचा केलेला नायनाट यामुळे भाजपाचे पारडे वरचढ आहे. म्हणूनच भाजपाविरोधात सर्वपक्षीय उभे राहून, ही कामगिरी लष्कराची आहे, मोदी यांनी त्याचे श्रेय घेऊ नये, यासाठी धडपडत आहेत. व्होटकटर म्हणून उत्तर प्रदेशात 200 जागा लढविणाऱ्या वसंतसेनेला पाकप्रश्नावरून भाजपाविरोधात उघड भूमिका घेता येत नाही. म्हणूनच मोदी, फडणवीस यांनी जाहीरसभेत भाग घेऊ नये, हा उद्धव यांचा आकांत, त्यांची अगतिकता स्पष्ट करणारा ठरतो.

संजीव ओक

सेव्ह द टायगर

indian_tiger“विसाव्या शतकाच्या प्रारंभी तब्बल एक लाख वाघ भारतात होते, परंतु आजच्या तारखेला साधारणतः केवळ साडे तीन हजार वाघ शिल्लक राहिल्याने, सेव्ह द टायगर हा प्रकल्प हिंदुस्थानी सरकारतर्फे राबविण्यात येत आहे. शिकार हा काही लोकांचा छंद बनल्यामुळे वाघांच्या संख्येत कमालीची घट झाली. 1990 मध्ये सरकारने व्याघ्रप्रकल्प हाती घेतला. त्यामुळेच 1990च्या दरम्यान केवळ सतराशे इतकीच असलेली वाघांची संख्या आता साडे तीन हजारांच्या घरात पोहोचली आहे.” (आंतरजालावरून साभार.)
हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे. हिंदुत्व हाच आमचा धर्म आहे. वाघ हा एकटाच जातो, अशी सेना स्टाईल टाळ्या घेणारी (आणि हशा पिकविणारी) वाक्ये उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेना संघटनेच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सेना तसेच ठाकरे यांना वाघाची उपमा त्यांनी दिलेली आहे. त्याचवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख सिंह असा करताना, सिंह चालताना मागे वळून पाहतो, तो कळपाने जातो, असा करत त्यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानली. मात्र, जसा एखादा गोलकिपर सेल्फ गोल करतो, तसाच उद्धव यांनी स्वतःच आपल्यावर एक गोल लादून घेत, अॅडव्हान्टेंज भाजपाला दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी 2002 पासून संपूर्ण विपरित परिस्थितीत गुजरातचा गड अबाधित राखून 2014 साली लोकसभेत दिमाखदार पदार्पण केले. सलग तीन वेळा विधानसभा निवडणुका एक हाती जिंकत त्यांनी आपले नाणे खणखणीत असल्याचे कर्तृत्वातून सिद्ध केले. नाणे खणखणीत आहे का रुपया खोटा आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांना कोणाच्या प्रमाणपत्राची गरज पडली नाही. अयोध्येत कारसेवा करून परतणाऱ्या कारसेवकांना रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळण्यात आले. (भाजपाने श्रीराम मंदिराचा प्रश्न सोडून दिला आहे, असा निखालस खोटा कांगावा उद्धव यांनी तर केला आहेच, त्याशिवाय रोखठोकच्या नावाखाली ठोकठोक करतानाही मुखपत्रातून हाच दिशाभूल करणारा मुद्दा मांडण्यात आला आहे.) 1980 च्या दशकात विश्व हिंदू परिषदेने (भाजपाने नव्हे) श्रीराम मंदिर उभारणीसाठीचा संकल्प सोडत कारसेवा सुरू केली. शिलान्यासही झाला. मुल्ला मुलायमने अयोध्येत हजारो कारसेवकांवर निघृणपणे गोळीबार केला. अक्षरशः त्यांच्या पाठीला बंदुका लावून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांचे मृतदेहही सापडू नयेत, यासाठी वाळूची पोती बांधून ते शरयूत सोडण्यात आले. मात्र, विहिंपचे कार्यकर्ते खचले नाहीत. पुन्हा जोमाने त्यांनी अयोध्येत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून बाबराने बांधलेला अनधिकृत ढाचा जमिनदोस्त करत, श्रीराम जन्मस्थळावर उभे करण्यात आलेल्या बाबराच्या अस्तित्वाची उरलीसुरली खूण मिटवून टाकली. न्यायालयातही हा लढा प्रविष्ट आहे. बाबराने जेथे ढाचा उभा केला होता, ते स्थान म्हणजे श्रीराम जन्मभूमीच होय, असा निवाडा न्यायालयाने दिलेला आहे. आता केवळ श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा आहे. हे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे 2002 मध्ये गुजरातमध्ये कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले, त्यानंतर गुजरात उभा पेटला. मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. हिंदुहृदयसम्राट म्हणून त्यांची त्यानंतरच ओळख प्रस्थापित झाली. त्याचा सल आजही ठाकरे यांना आहे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. ‘सबका साथ, सबका विकास,’ हे हिंदुस्थाननो शेर मोदी यांचे सगळ्यांना एकत्र घेत पुढे जाण्याचे धोरण त्यांच्या प्रतिमेला साजेसेच. जंगलाचा राजा म्हणूनच सिंहाची ओळख होती, आहे. असो.
शिवसेनेने हिंदुत्वाच्या फुकाच्या वल्गना करू नयेत. ज्या संघटनेची वाढच काँग्रेसी आधाराने झाली, ती संघटना हिंदुत्ववादी असूच शकत नाही. कुख्यात दाऊदला हिंदुस्थानात आणा, ही याच संघटनेची मागणी. मात्र, याच दाऊदच्या मुलाशी ज्या जावेद मियाँदादच्या मुलीचा निकाह होता, त्या जावेदने या निकाहचे निमंत्रण बाळासाहेबांना देण्यासाठी ‘मातोश्री’च्या पायऱ्यांवर डोके टेकताच, तो पवित्र झाला, त्याला तेथे प्रवेश मिळाला. यातूनच या संघटनेचे हिंदुत्व किती कट्टर आहे, याचा दाखला मिळतो. शिवसेनेचे आणि काँग्रेसचे नाते कसे आहे, याचा दाखला पुढे दिला आहे.
uddhav_thackerayशिवसेना आणि काँग्रेस
“शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली आणि त्यापुढची दोन दशकं ठाकरे यांनी केवळ मुंबई आणि ठाणे याच परिसरातील महापालिकांच्या राजकारणावर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं होतं. कम्युनिस्ट आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या निर्घृण हत्येनंतर तापलेल्या वातावरणाचा फायदा उठवत, शिवसेनेनं आपला पहिला आमदार १९७० मधे विधानसभेत धाडला आणि पुढे अधूनमधून विधानसभाच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरुन बघितलं. १९६६ ते १९८५ या दोन दशकांत काँग्रेसशी साटंलोटं करुन शिवसेनेनं विधान परिषदेच्याही काही जागा हासील केल्या. या २० वर्षांच्या काळात शिवसेना एकीकडं डांगे – एस. एम. जोशी – अत्रे – जॉर्ज फर्नांडिस अशा नेत्यांना ‘लक्ष्य’ करीत होती आणि ते काँग्रेसच्या सोयीचं असंच राजकारण होतं… आज राज्यात काँग्रेसविरोधातील एक प्रमुख पक्ष म्हणून मान्यता मिळवणार्‍या या संघटनेनं पहिल्या दोन दशकांत सातत्यानं काँग्रेसलाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या बळ पुरवलं. शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या दहा वर्षांत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जारी केली, तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी त्याविरोधात आंदोलन केलं आणि बड्या राजकीय नेत्यांबरोबरच लक्षावधी कार्यकर्त्यांनी कारावासही पत्करला. पण, शिवसेनेनं मात्र आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला होता! एवढंच नव्हे तर आणीबाणीनंतर जनता पक्षाचा प्रयोग फसला आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यावर १९८० मधे महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर ठाकरे यांनी थेट काँग्रेस प्रचाराची पालखी खांद्यावर घेऊन विधान परिषदेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. यावर आताच्या तरुण शिवसैनिकांचा विश्वासही बसणं अवघड आहे…” (साभारः प्रकाश अकोलकर (‘महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ’ या पुस्तकातून))
लोकशाहीचा गळा घोटणारी आणीबाणी इंदिरा गांधी यांनी देशावर लादली. शिवसेना या संघटनेने याला विरोध केला नाही हे विशेष. या संदर्भातील एक आठवण उद्धव यांनी सांगितली आहे. ते म्हणाले, “रजनी पटेल त्यावेळी काँग्रेसचे शहेनशहा होते. त्यांनी शिवसेनाप्रमुखांना एक पत्र पाठविले आणि त्यावर सही करायला सांगितले. सही नाही केली तर तुरुंगात पाठविण्याची धमकीही दिली. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी ते पत्र ज्यांनी आणले त्याला दिले आणि म्हणाले, हे पत्र पटेलांकडे घेऊन जा आणि सांग, जेव्हा मला तुरुंगात टाकशील तेव्हा दुसर्‍याच दिवशी तुझी तिरडी उठलेली दिसेल.” टाळ्या घेण्यासाठी हे वाक्य योग्य होते. नाहीतरी महापालिका स्वबळावर का कशा? याशिवाय अन्य कोणता मुद्दाही त्यांच्यापाशी नव्हता. प्रत्यक्षात शिवसेनेचा आणीबाणीला पाठिंबा होता. संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे.
“दि. २६ जून १९७५ रोजी साऱ्या भारतात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याची राष्ट्रपतींनी घोषणा केली. अंतर्गत गडबडीमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचे सांगून त्यांनी आणीबाणी जाहीर केली. त्यानंतर अनेक नेत्यांची धरपकड करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र आणीबाणीला पाठिंबा दिला. यासंदर्भात बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मध्ये, ‘आणीबाणीत राष्ट्राभिमानी उभे करा, मेंढरे नकोत!’ आणि ‘शिस्तपर्व सुरू झाले’ असे दोन अग्रलेख लिहिले.” (शिवसेना संकेतस्थळावरून साभार)
विश्व हिंदू परिषदेने श्रीराम मंदिराचा मुद्दा उचलला, अयोध्येत हजारो कारसेवक गोळीबारात बळी पडले, बाबरी पडली. त्यानंतर बाबरी पाडणारे जर शिवसैनिक असतील, तर मला त्यांचा अभिमान आहे, असे व्यक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि एकाएकी त्यांचे नाव देशाच्या राजकारणाच्या पटलावर झळकू लागले. बाळासाहेब हे स्वयंघोषित हिंदुहृदयसम्राट बनले, मुखपत्रातून हा समज पक्का केला गेला. (मुखपत्र हे दिल्लीतही उत्सुकतेने वाचले जाते, अशीही ठोकठोक आहे. हे मुखपत्र देशातील प्रमुख राजकीय पक्षाविरोधात म्हणजेच भाजपाविरोधात आज नव्याने काय गरळ ओकते आहे, यासाठी या राज्यातील संघटनेचे मुखपत्र वाचले जाते. यातील मतांना मूल्य मिळते ते यात मोदी या जागतिक नेत्याच्या विरोधात लिहिले गेले असते म्हणून. बाकी बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला आपल्यामुळेच हे गाडे चालले आहे, असे वाटते. कोणी काय समज ठेवावेत, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.)
आम्हाला सत्तेचा लोभ नाही, परंतु अपशकून नको म्हणून सहभागी झालो, असे उद्धव म्हणतात.
bal_thackerayवस्तुस्थिती काय आहे? सोळा वर्षांपूर्वीच राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार आलेच नसते. राज्यात त्रिशंकू अवस्था होती. सेना, भाजपा, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस यापैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नव्हते. सेना-भाजपा तसेच अपक्ष यांची गोळाबेरीज करूनही बहुमताचा आकडा गाठता येत नव्हता. त्यावेळी भाजपाच्या गोपिनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा मिळवला होता. मात्र, शिवसेनेला मुख्यमंत्रीपदच हवे होते. ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, अशा अटीशर्ती निवडणुकीपूर्वीच ठरल्या होत्या. सेनेचे आमदार जास्त असल्याने, सेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला. गोपिनाथ मुंडे यांचे म्हणणे असे होते, की भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवत आवश्यक ते संख्याबळ गाठून दिल्याने भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा. मातोश्रीवर आठवडाभर बैठकांची मालिकाच सुरू होती. ठाकरे मुख्यमंत्रीपदावर ठाम राहिल्याने राज्यात काँग्रेस आघाडीचे भ्रष्ट सरकार सत्तेवर आले. सेनेच्या वेलीला वाढण्यासाठी ज्या काँग्रेसने तब्बल दोन दशके पाठिंबा दिला, त्याचे ऋण हे असे फेडले गेले का?
युती करावी की नाही, याची उद्धव यांची संभ्रमावस्था कायम आहे, म्हणूनच तीन-तीन वेळा त्यांनी आमची युती तोडायची इच्छा नाही, असे सांगितले. रोखठोक शब्दांत भूमिका मांडणारे बाळासाहेब आणि कचखाऊ मनोवृत्तीचे उद्धव यांच्यातील फरक या त्यांच्या भूमिकेने अधोरेखित केला. देशाचा पंतप्रधान हा सर्वसामान्यांचा असला, तरी तो एका पक्षाचा प्रतिनिधी असतो. जेव्हा सरकारची धोरणे चुकतात, त्यावेळी पंतप्रधानांना जबाबदार धरले जाते, त्यामुळे त्यांनी निवडणुकीत पक्षाचा प्रचार केला, तर त्याला आक्षेप कसा घेतला जाऊ शकतो? मात्र, राजकीय अपरिपक्व उद्धव यांनी wp-1452780194978.jpegपंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभांनाच आक्षेप घेतला आहे. देशात मोदी लाट होती, म्हणूनच आपले अठरा दगडधोंडे विजयी झालेत, याची त्यांना पुरेपूर कल्पना असल्यामुळेच मोदी यांनी प्रचार करायला नको, असे त्यांना वाटत असेल, तर त्यात त्यांचीही काही चूक नाही. ज्या मोदी नामक वादळाने देशातील सर्वात जुन्याजाणत्या पक्षाला नेस्तनाबूत केले, तेथे शिवसेना ही तर राज्यापुरती मर्यादित असलेली संघटना आहे. 50 वर्षांत या संघटनेला राज्यात एकदाही स्वबळावर सत्तेवर येता आले नसले, तरी ही संघटना सुरुवातीचा 25 वर्षे मुंबई-ठाणे व राज्यातील काही निवडक भागांपुरतीच मर्यादित होती, या तिच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्यात. उद्धव यांनी ममता बॅनर्जी यांचे उदाहरण दिले आहे. मात्र, ममतांनी पश्चिम बंगालमध्ये स्वकर्तृत्वावर गड राखलेला आहे. शिवसेना 50 वर्षांत आजवर एकदाही राज्यात सत्तेवर येऊ शकलेली नाही. अगदी मित्रपक्ष भाजपाला अंधारात ठेवत 2014 वेळी आदित्यने मिशन 150+ आखले तरीही. युती होणारच नाही, याची काळजी घेत, जागावाटपांवरून शेवटपर्यंत भाजपाला झुलवत ठेवण्यात आले. त्याचवेळी स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी कार्यकर्त्यांना केव्हाच संदेश दिला गेला होता. भाजपाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शाह यांना शहाणे व्हा, असे आततायी सल्ला देण्यापर्यंत सेनेची मजल गेली. मात्र, युती तुटल्याचे खापर पूर्णपणे भाजपावर फोडत, मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा सेनेचा प्रयत्न फोल ठरला. मोदी प्रचाराला राज्यात आल्यानंतर त्यांची संभावना अफझल्याची फौज अशीही करण्यात आली. मिशन 150+ तेथेच फेल झाले. पूर्ण ताकद लावूनही जेमतेम 63 जागा सेनेला मिळाल्या. याचा सल आजही उद्धव यांच्या मनात असेलच. म्हणूनच त्यांनी मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवरून वेळोवेळी त्यांच्यावर टीका केली आहे. मोदी यांचा प्रत्येक दौरा हा देशासाठीच असतो, अन्य नेत्यांप्रमाणे ते विदेशवारी करत नाहीत, हे सामान्याती सामान्य जनतेलाही पटले आहे, त्याचवेळी त्यांचे कट्टर विरोधकही त्यावरून काहीही बोलत नाहीत. मात्र, उद्धव यांनी पुन्हा एकदा त्याचवरून मोदी यांच्यावर टीका करताना स्वतःचेच हसे करून घेतले आहे.
ज्या बाळासाहेबांनी शिवसेना नावाची संघटना जन्माला घातली, त्याच बाळासाहेबांचे नाव घेत आजही उद्धव यांना सैनिकांना आवाहन करावे लागते, हे बाळासाहेबांचे दुर्दैव की कोणाचे… मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भाजपाचा एक आमदार सेनेपेक्षा जास्त आहे. भाजपाची ताकद मुंबईत नक्कीच वाढलेली आहे. राज ठाकरे यांचे आव्हानही उद्धव यांच्यासमोर आहे. मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे रोजच निघत आहेत. संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यादिवशीच ज्या काही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, त्यानेही नाले तुंबले. सेनेच्या कामाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. रस्ते, नालेसफाई आदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालेला आहे. अशातच राज्य सरकारने मुंबई महापालिकेत होत असलेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपांमुळे मुख्य लेखापरिक्षकाचे पद थेट मंत्रालयातून नियुक्त केले आहे. तब्बल 36 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या पालिकेतील व्यवहारांचे किमान 20 ते 25 टक्के लेखापरिक्षण आवश्यक असताना फक्त 2 टक्के इतकेच ते होते. शिवसेनेने या निर्णयाला विरोध केला आहे. मुंबई पालिकेसाठी युती तोडू नका, अशी विनंती उद्धव यांनी भाजपाला का केली आहे, याचे उत्तरच 36 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प ज्या मुंबई महापालिकेचा असतो, त्याच्या भ्रष्ट कारभारात दडलेले आहे. उद्धव स्वतःला वाघ समजतात, तसे त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवले आहे. म्हणूनच ‘सेव्ह द टायगर’ या योजनेची गरज नेमकी कोणाला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

संजीव ओक

सेना @50

wp-1460054373811.jpegबाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या, काँग्रेसी आधारावर मोठ्या केलेल्या शिवसेना नामक संघटनेच्या स्थापनेला 19 जून रोजी 50 वर्षे पूर्ण झाली. उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणेच भाजपाचा थेट नामोल्लेख न करता, यांचे असे, त्यांचे तसे… असे म्हणत केंद्र तसेच राज्य सरकारवर मनसोक्त टीका केली. मनोगताच्या समारोपावेळी मात्र अन्य कोणत्या पक्षाने आम्हाला सुचवू नये, हा आमचा प्रश्न आहे, वगैरे वगैरे मखलाशी करत, पुन्हा एकवार युती झाली तर ती कशी व्हायला पाहिजे, याबाबत मत मांडून अन्यथा स्वबळावर अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली. त्यापूर्वी आपणाला सत्तेचा मोह नाही, सेना सत्तेसाठी लाचार नाही, हे सांगण्यास उद्धव जसे विसरले नाहीत, तसेच भाजपाने केलेल्या कामांचे श्रेय निलाजरेपणाने लाटूनही मोकळे झाले. काय होते उद्धव यांच्या मनोगतात, यापेक्षा काय नव्हते… हेच पाहणे जास्त रंजक ठरणार आहे. लाटेवर ओंडकेही तरंगतात, असे त्यांनी म्हणत पिटातल्या टाळ्या घेतल्या खऱ्या, परंतु ही लाट कोणती याचे नामोल्लेख त्यांनी केला नाही. लोकसभेवेळी देशभरात जी मोदी लाट (आमच्यालेखी तर घोंघावते वादळ, ज्यात काँग्रेस पालापाचोळ्यासारखी फेकली गेली) आहे, त्यात सेनेचे अठरा दगडधोंडेही तरले, नुसते तरले नव्हे तर विजयाचा शेंदूर त्यांच्या कपाळी लागला, हेही त्यांनी सांगायला हवे होते. सत्तेसाठी लाचार नाही म्हणता, पण राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत जात, भाजपाची संभावना निजामाचा बाप अशी करणाऱ्यापर्यंत मजल मारता, याच निजामाच्या बापाच्या रांगेत सेनेचे मंत्री-संत्री आहेत, ते निजामाचे कोण? याचे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होते. लोकसभेत निवडणूकपूर्व युती होती, त्यामुळे खासदारांना सत्तेतून बाहेर पडता येत नाही, पडलेच तर खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो, तो दिला तर पुन्हा निवडून यायची शाश्वती नाही, या कारणास्तव सेना भाजपापासून दूर होत नाही, ही मजबुरी आज सांगायला हवी होती. भाजपा निजामाचा बाप म्हणजे सत्तेत सहभागी यांचे आमदार औरंग्याची पिलावळ का? बिहारमध्ये शिवसेनेने काँग्रेसचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वीही झाला. व्होटकटरची भूमिका सेनेने तेथे चोख बजावली. उत्तर प्रदेशमध्येही आता सेना तेच करणार आहे. त्यामुळे श्रीराममंदिराचा प्रश्न आज मांडला गेला नसता, तरच नवल होते. अपेक्षेप्रमाणेच उद्धव यांनी तो मांडला. मात्र, पुन्हा एकदा गोबेल्सनिती वापरत, ज्यांनी श्रीराममंदिराचा प्रश्न हाती घेतला होता, त्यांनी तो केव्हाच सोडलाय, असे म्हणत नथीतून तीर मारला. अर्थात त्यांनी त्यांच्या कुवतीनुसार आणि ऐपतीनुसार मांडल्याने, त्यांचे वैचारिक दारिद्र्यच त्यातून दिसून आले. मुळात अयोध्येत श्रीराम जन्मभूमीस्थळी भव्य मंदिर उभा करण्याचा संकल्प विश्व हिंदू परिषदेने सोडला होता. आजही विहिंप त्यासाठी प्रयत्नात आहे. विहिंपच्या प्रयत्नांचाच भाग म्हणून अयोध्येत जेथे बाबराने ढाचा उभारला होता, ते स्थान म्हणजे ayodhya_jai_shri_ramश्रीराम जन्मभूमीच असल्याचा ऐतिहासिक निवाडा न्यायालयाने दिलेला आहे. मंदिर उभारण्यातला मोठा अडथळा दूर झालेला आहे. आता प्रश्न फक्त जागा वाटपाचा आणि त्याजागी मशिद उभा करू द्यायची की नाही? हाच आहे. हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने, जगभरातील सर्व हिंदूंना न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. मात्र, मंदिर उभारले गेले नाही, याचे खापर भाजपाच्या डोक्यावर फोडत उद्धव यांनी उत्तर प्रदेशात सेनेचा प्रचार कोणत्या पातळीवर असेल, याचीच झलक दिली आहे. महापालिकेत युती करू मात्र ती कोणतीही तडजोड न करता, असे उद्धव यांनी सांगितले असले, तरी भाजपामधील एका उच्चपदस्थ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सेनेने भाजपाला युती तोडू नका, असे साकडेच घातलेच आहे. ज्या मराठी मतांच्या टक्क्यावर मुंबईत सेना मोठी झाली, तो मराठी टक्काच मुंबईतून हद्दपार झालाय. जो काही थोडाफार टक्का आहे, तो पूर्णपणे सेनेचा नाही. त्यातही वाटेकरी आहेतच. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ना केवळ हिंदुस्थानचे तर जागतिक नेते म्हणून उदयाला आले आहेत. देशोदेशेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या घालत आहेत. अशा जागतिक नेत्याला आणि त्याच्या पक्षाला निजामाचे बाप म्हणून सेनेने हिणवलेले, कोणालाही रुचलेले नाही. ही जी बिगर मराठी मते आहेत, ती सेनेच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता धूसर आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत, कंत्राटदारांवर गुन्हे दाखल होत आहेत. रस्ते तसेच नालेसफाईत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसते आहे. सेनेला आर्थिक रसद पुरवणारी ही दुभती महापालिका हातातून जाण्याची स्पष्ट चिन्हे दिसत असल्यामुळेच भाजपाला युती न तोडण्याचे साकडे घातले गेल्याचे हा उच्चपदस्थ सांगतो. युती तुटल्याचे खापर पुन्हा एकवार भाजपाच्या माथी फोडण्यात आले. जागा वाटपावरून भाजपाला एकीकडे झुलवत ठेवत, तुळजापूर येथून प्रचाराचा नारळ फोडताना सेनेने स्वबळाची हाकच सैनिकांना दिली होती. आम्ही विसरलेलो नाही. सत्तेचा मोह नाही म्हणता, मग सत्तेत सहभागी कशाला झालात? सत्तांतर झाल्याने अपशकून नको, म्हणून सत्तेत सहभागी झालो, असे तुम्ही म्हणता. अपशकून करायचा नव्हता, तर बाहेरून पाठिंबा देत, भाजपाचे सरकार स्थापन करता आले असते की… वस्तुस्थिती ही आहे की भाजपाला पाठिंबा दिला नसता, तर सेना उभी फुटली असती. एक गट त्यासाठी पूर्णपणे तयारीलाही लागला होता. 63 जागा जिंकल्या असे अभिमानाने सांगितलेत, पण तुम्ही मिशन 150+ ठेवले होते, हे नाही सांगितलेत. उद्धव कसे आहे माहिती आहे का, तुम्ही नाही सांगितलेत, तरी वस्तुस्थिती अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सेनेने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग उभारला, मुंबईत 55 उड्डाणपूल उभारले म्हणून सांगता, मग बाळासाहेब ठाकरे यांचे साधे स्मारकही तुम्हाला का उभा करता आले नाही, हेही सांगायचे होतेच की. ज्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांना आज तुम्ही हिणावलेत, तेच पवार बाळासाहेबांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष कसे, हेही सांगायचे होतेत. त्यामुळे विश्वासार्हता कायम राहिली असती. पारदर्शकता का काय म्हणतात ती… नाही का… सत्तेवर आल्यावर सीमाप्रश्न 24 तासांत सोडवू, असे आश्वासन बाळासाहेब यांनीच दिले होते. कोल्हापूर येथे. तुम्ही त्यावेळी एखाद्या जंगलात किंवा गडकोटावर असाल, हातात कॅमेरा घेऊन. पण सत्ता आलीही, गेलीही. सीमाप्रश्नाचे घोंगडे तसेच भिजत पडले आहे. तुम्ही जे काही राजकारण करता, त्यात अनेक पोटार्थी भाटांना तुमच्यातील मुत्सद्देगिरी दिसते. पण याचे मूळ काँग्रेसी संस्कृतीत आहे, हे त्यांना उमजत असूनही ते मान्य करत नाहीत. त्यांचाही नाईलाज आहे. तुमच्याकडूनच रोकडे घ्यायचे म्हटल्यावर तुमच्याविरोधात कसे बोलणार, कसे लिहिणार… मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध तुम्हीच केला, भाजपाने जलदूत (विशेष रेल्वे गाडी) मार्फत कोट्यवधी लिटर पाणी लातूरला पोहोच केले. त्याबद्दल अवाक्षर नाही काढलेत. जलयुक्त शिवार ही फडणवीस सरकारची योजना यशस्वी झाली, विदर्भ, मराठवाड्यातील नदीनाले तुडूंब भरून वाहू लागले, लगेचच तुम्ही ही तुमची योजना म्हणून आपलीच कशी लाल, हे सांगण्याचा प्रयत्न केलात. असो. राजकारणात हे असे चालतेच. बाकी तुमचे परिवहनमंत्री (सेनेचे हो) यांनी सर्वसामान्य, गोरगरिब जनतेच्या एसटीच्या तिकीटात एक रुपयांची वाढ करून त्यांच्यावर बोजा टाकलाय. जनता फडणवीस सरकारच्या नावाने ओरडतेय… एका रुपयावरून तुमचे काही अडत नाही. गावात एक कप चहासाठी लागणारी चहा पावडर रुपयाची घेतली जाते आजही… तुम्हाला काय सोयरसुतक म्हणा… शिव्याशाप भाजपा सरकारला आहेत…  असो. शिवसेना ही एक संघटना आहे, संघटनाच राहील. तुम्ही बिहारमध्ये निवडणूक लढवलीत, पण ती भाजपाची मते खाण्यासाठी, जिंकण्यासाठी नव्हे. इतका संदर्भ पुरे.

modi-11जाता जाताः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांचा आज पुन्हा एकदा उल्लेख केलाय. पाच देशांचा जो दौरा गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांनी केला, त्याचे फळ म्हणून एमटीसीआरचे सदस्यत्व हिंदुस्थानला मिळाले. रशियाने ब्राह्मोस-3 या क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी हिंदुस्थानकडे मागणीही नोंदवली. आजवर जो देश शस्त्रास्त्रे आयात करत होता, तोच देश ती आता निर्यात करणार आहे. पाच देशांचा दौरा करताना, मोदी यांनी तीन रात्री विमानातच झोपून काढल्या. देशाचा पैसा ते उधळत नाहीत.

सीमाप्रश्न आणि सेना

shivsena-bal1995 साली नारायण आठवले यांनी बेळगावात येऊन, महाराष्ट्र एकिकरण समितीवर अतिशय खालच्या पातळीवर चिखलफेक करत, एकिकरण समितीच्या उमेदवारांना पाडण्याचे काम केले. त्यानंतर 2000-01 साली झालेल्या निवडणुकीत सेनेचे नगरसेवक बेळगावात निवडून आले. सेनेने खाते उघडले, पण सीमाप्रश्न काही सुटला नाही. मग हे नगरसेवक नेमके कशासाठी होते? पक्षवाढीसाठी का अन्य कारणांसाठी? बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका काय होती?

“सीमाप्रश्न म्हणजे मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. महाराष्ट्र-कर्नाटक यांतील वादग्रस्त भाग महाराष्ट्रात यावा, महाजन कमिशनने केलेला अन्याय दूर व्हावा यासाठी शिवसेना मनापासून या विषयावर सतत बोलत असते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र समितीची संपूर्ण महाराष्ट्र समिती झाली, परंतु समितीने या प्रश्नावर तीव्र आंदोलन केले नाही. किंबहुना महाराष्ट्रात मुंबई आल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती हळूहळू निस्तेज होऊ लागली. म्हणून महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या मराठी माणसाला चेतविण्याचे काम आवश्यक होते. शिवसेनाप्रमुखांनी हे अचूक ओळखले आणि १९६७ च्या ऑक्टोबर महिन्यात बेळगाव-कारवारच्या सीमा भागातील जनतेच्या मागणीस पाठिंबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्रभर ‘काळा दिन’ पाळण्याचे आवाहन मराठी जनतेला एक पत्रक काढून केले. त्या दिवशी घराघरावर काळे झेंडे लावावेत आणि दंडावर व छातीवर काळ्या फिती लावाव्यात, असा आदेश शिवसैनिकांना देण्यात आला. ‘असहाय्य, एकाकी, हताश सीमा भागातील जनतेच्या पाठीशी आता महाराष्ट्राने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे’ असे शिवसेनाप्रमुखांचे मत झाले.”
(सीमा प्रश्न आंदोलन (१९६७), शिवसेना संकेतस्थळावरून)

संजीव ओक

पंचायत टू पार्लमेंट

स्थानिक स्वराज संस्थांपासून ते संसदेपर्यंत भाजपाचे सरकार ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या मतदानकेंद्रावर लक्ष केंद्रित करावे, देशात काय चालले आहे, राज्यात कोण आघाडीवर आहे, माध्यमे काय म्हणताहेत याचा विचार न करता, त्याने आपल्या मतदानकेंद्रातील सर्वच्या सर्व मते पक्षाला कशी मिळतील, याची दक्षता घेतल्यास, पंचायत टू पार्लमेंट भाजपाचीच सत्ता असेल. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या दोन वर्षांपासून आहे, तर राज्यात दोन वर्षे पूर्ण व्हायला काही महिनेच बाकी आहेत. या काळात केंद्र तसेच राज्य सरकारने अनेक लोकोपयोगी योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. भ्रष्ट काँग्रेसने 68 वर्षे केलेली घाण भाजपाला साफ करायची होती, परंतु विरोधक मात्र आपण काय केले याकडेच लक्ष देत आहेत. टोलमुक्तीची घोषणा भाजपाने दिल्यानंतर लगेचच ती प्रत्यक्षात का आली नाही, याची विचारणा होते. सहा महिन्यांत टोलमुक्ती झालीही. मात्र, आपणच आपल्या सरकारचे कार्य सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात कोठे कमी पडतो आहोत का? हा प्रश्न आज उपस्थित होतो आहे. जन धन योजना असो वा मुद्रा बँक प्रत्येक योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे. तळागाळातल्या जनतेपर्यंत त्याचे लाभ मिळत आहेत. माध्यमे त्याचा उल्लेख करत नाहीत, परंतु आपण याबाबतची माहिती छातीठोकपणे दिली पाहिजे. ज्यांनी करोडो रुपयांचे भ्रष्टाचार केले, ते आज भाजपावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज नाही. त्याचवेळी आडवे येणाऱ्या विरोधकांना सोडू नका, त्यांना अंगावर घ्या, त्याचे आरोप खोडून काढा आणि राजकारणातून अशा प्रवृत्तींचे संपूर्ण उच्चाटन करा. नाशिक येथील ब्रह्मगिरीला पोहोचायचे असेल, तर प्रत्येक पायरीवर माकड बसलेले असते, त्याला चणे-फुटाणे दिले नाहीत, तर ते तुमची अडवणूक करते. आपल्याला ब्रह्मगिरी गाठायची असेल, तर या माकडांकडे दुर्लक्ष करायला शिका, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी विरोधकांवर टिका करतानाच, कार्यकर्त्यांनी येत्या काळात काय भूमिका घेतली पाहिजे, हे स्पष्ट केले.

ज्यांनी भूखंडाचे श्रीखंड ओरपले तेच भ्रष्ट नेते भाजपावर बेतालपणे आरोप करत आहेत. अशा काँग्रेसी-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपले भूखंड अगोदर परत करावेत, मग भ्रष्टाचाराबद्दल बोलावे. यांच्याकडून शिकण्याची आमच्यावर वेळ आलेली नाही. या भष्ट्र आघाडीच्या नेत्यांना सडेतोडपणे उत्तर द्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

त्याचवेळी सत्तेत सहभागी असूनही सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेबरोबर युती करावी का? हा प्रश्न उपस्थित झाला. व्यंकय्या नायडू यांनी ही घरातील भांडणे आहेत, ती आपापसात सोडवायची असतात, असे व्यक्तव्य केल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. मात्र, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्यास तयार रहा, असाच संदेश रविवारी कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना देण्यात आला.

पुण्यात दि. 18 व 19 जून या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात भाजपाची भूमिका काय असेल, हेच सुचविण्यात आले. पंचायत टू पार्लमेंट ही संकल्पना आता प्रत्यक्षात आणायची वेळ जवळ आली आहे. ज्या काँग्रेसने दोन खासदारांचा पक्ष म्हणून भाजपाची संभावना केली होती, तोच आज स्वबळावर केंद्रात सत्तेवर आहे, राज्यातही भाजपाचेच सरकार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भाजपाने केलेला प्रवास हा दैदिप्यमान असाच आहे. मात्र, सत्ता कायम राखायची असल्यास, आपापल्या प्रभागातील समस्या काय आहेत, त्यांची सोडवणूक करण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या, असेही पदाधिकाऱ्यांना सांगितले गेले.

सत्ता ही अळवावरच्या पाण्यासारखी आहे. आजचा मंत्री उद्या माजी मंत्री होतो, लोकप्रतिनिधीही माजी होतात. पद हे केवळ पाच वर्षांपुरतेच असते, परंतु कार्यकर्ता हा कायम कार्यकर्ता असतो. भाजपा हा एका उच्च प्रथापरंपरांचे पालन करणारा पक्ष आहे. यातील कार्यकर्ते हे समर्पित वृत्तीने कार्य करणारे आहेत, त्यांच्यामुळेच भाजपाला यश मिळालेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. ज्यावेळी सत्ता असते त्यावेळी कार्यकर्त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. वाईट दिवसांमध्ये मनोबल टिकवणे सोपे. मात्र चांगल्या दिवसांत ते टिकवणे आव्हानात्मक असल्याचे सांगून राजकारणाच्या रंगात रंगून आपला मूळ रंग जाऊ देऊ नका, असे आवाहन
नितीन गडकरी यांनी केले. कॉंग्रेसच्या घराणेशाहीवरही गडकरी यांनी जोरदार प्रहार केला. भाजपा कुणाच्याही मनाप्रमाणे चालत नाही किंवा कोणा परिवाराच्या हातात पक्षाची सत्ता नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यापैकी कुणाही एकाच्या मनाप्रमाणे पक्ष चालत नाही, असे गडकरी यांनी सांगत काँग्रेसी घराणेशाहीवर हल्लाबोल केला. राजकारण आरामात कधीच होत नसते. ते केवळ क्रांतीतूनच होत असते. संघटनेच्या प्रक्रियेतून तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनाच नेतृत्व मिळते. आजपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. वेळप्रसंगी मरेन, मात्र कॉंग्रेसमधे कधीही प्रवेश करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी गडकरी यांनी काँग्रेसबद्दलची भूमिका मांडली.
सेनेशी युती नकोच…
भाजपाला निजामाचा बाप म्हणणार्‍या शिवसेनेशी युती करण्यावरून, असे अभद्र बोलणार्‍यांशी युती ठेवू नये, असे मत यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडले. विनोद तावडे यांनी शिवसेनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर आगामी महापालिका-जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती ठेवायची की नाही, यावर चर्चा सुरू झाली. यावेळी प्रदेश कार्यकारणीच्या सदस्यांनी आपली परखड मते मांडली. मधु चव्हाण यांनी शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत भाजपाला निजामाचा बाप म्हणणार्‍यांसोबत युती ठेवू नका, असे मत मांडत भाजपाने स्वतंत्र निवडणुका लढावाव्यात, आमच्या मनगटात तेवढे बळ आहे, अशी सडेतोड भूमिका मांडली असता, त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.
पंचायत टू पार्लमेंट
येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होत आहेत. पक्षाचा जनाधार वाढवायचा असेल, तर या निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत, असे स्पष्ट मत मांडले गेले. सहकार क्षेत्रातही केवळ भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर न काढता, जिल्हा बँक, बाजार समित्या यावर लक्ष केंद्रित केल्यास, सहकारक्षेत्रात पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचा विस्तार होईल. यासाठी ठोस कालबद्ध आराखडा आखून, त्याप्रमाणे आतापासून प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका प्रविण दरेकर यांनी मांडली. राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज संस्था भाजपाच्या ताब्यात असल्या पाहिजेत, अशी पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केली. म्हणूनच स्वबळावर निवडणूक लढवत, पंचायत टू पार्लमेंट असा नारा पुण्यातील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दिला गेलाय. येत्या काही महिन्यांतच भाजपाला त्यात कितपत यश मिळते आहे, हे स्पष्ट होईल.

संजीव ओक

भारतमाता की जय

खुर्ची गेली तरी चालेल, पण ‘भारतमाता की जय’ बोलणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितल्याने काँग्रेसी ‘वसंत’सेनेच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. ‘भारतमातेची लेकरे पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, तडफडत आहेत, पाण्यासाठी एकमेकांचे रक्त पिण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, घरात पिण्याचे पाणी देईन नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी गर्जना मुख्यमंत्र्यांनी केली असती, तर बरे झाले असते,’ अशा शब्दांत वसंतसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजपावर टीका करण्यात धन्यता मानलेली आहे. त्याचवेळी मराठवाड्यातील तरुण घोटभर पाण्यासाठी शस्त्र हातात घेऊन दहशतवादी तर बनणार नाहीत ना? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलेला आहे. ‘वसंत’सेनेने मुखपत्रातून जणुकाही भाजपा दुष्काळ निवारणासाठी काहीही करत नाही, अशा थाटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावती झाली आहे. त्याचवेळी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या पापांमुळे आज ही वेळ ओढवलेली आहे, त्या आघाडी सरकारबाबत अवाक्षरही न उच्चारता आज तुमच्या हाती सत्ता आहे. तुम्ही मागच्यांवर खापर फोडून लोकांना असे तहानलेले ठेवू शकत नाही, असे सांगण्यास ‘वसंत’सेना विसरलेली नाही. वसंतसेनेला सत्तेत सहभागी होऊनही मंत्रीपदाची मलई न मिळाल्याने ती नाराज असल्याचे वास्तव आता नवीन राहिलेले नाही. ते आता क्रॉनिक म्हणजेच जुने दुखणे झाले आहे. मात्र, जखमा जेव्हढ्या जुन्या, तेव्हढ्या त्या अधिकच ठसठसतात. गळवासारख्या त्या पिकल्या की वेदना असह्य होतात, त्यामुळेच जो काही उद्वेग आहे, तो अधिकच उसळतो.
राज्यात ‘वसंत’सेना सत्तेत असूनही तशी ती नाहीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वसंत’सेनेच्या सर्व धमक्यांना फाट्यावर मारत, राज्यातील सरकार अडचणीत आणू अशी धमकी सत्तेत सहभागी मित्र पक्षाकडून मिळूनही ‘वसंत’सेनेला सत्तेत सहभागी करून घेतलेले नाही. ‘वसंत’सेनेची अडचण ही आहे, की राज्यात विरोधी पक्षाच्या बाकड्यांवर बसायचे म्हटले, तर केंद्रातील मंत्रीपदांवर ‘पाणी’ सोडावे लागते. कारण लोकसभेला ‘वसंत’सेनेने निवडणूकपूर्व युती केली होती. त्यामुळे ती तोडली तर खासदारांना आपल्या पदाचाही राजीनामा द्यावा लागणार आहे. जे काही यांचे दगडधोंडे निवडणुकीत निवडून आले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्याईवरच. आता निवडणुकीला ते उभे राहिले, तर त्यांची अमानत रक्कमही जप्त होणार हे कोणीही सांगेल. त्यामुळेच आता भाजपाविरोध हा वारंवार होऊ लागलेला आहे. आम्ही मागेही म्हटलेले होते, ‘वसंत’सेनेचे वागणे हे एखाद्या रंडकीसारखे असून, तिच्या शेजारची दुर्दैवाने अकाली विधवा झाली, तर तिच्या सहभागी न होता, आता ही सुद्धा आपल्यासारखी झाली, याचा विकृत, असुरी आनंद मानणारी ती आहे. म्हणूनच दिल्ली, बिहार विधानसभेत भाजपाला अपेक्षित यश न मिळताच, आपल्या मुखपत्रातून ‘वसंत’सेनेने जणू दिवाळी-दसरा असल्यासारखा आनंद व्यक्त केला होता. बिहारमध्ये भाजपा विरोधात सर्व असा विषम सामना होता. असे असतानाही भाजपाने तेथे सर्वाधिक मतांची टक्केवारी घेतली होती. त्याचवेळी ‘वसंत’सेनेने केवळ आणि केवळ भाजपाचे उमेदवार विजयी होऊ नयेत, म्हणून तेथे आपले उमेदवार लावलेले होते. त्यांनी मते खाल्ल्यामुळे भाजपाच्या कित्येक जागा अवघ्या काही हजार मतांनी गेलेल्या आहेत. असो.
विषय राष्ट्राभिमानाचा आहे, सोयीनुसार हिंदुत्व, सवडीनुसार मराठी अशी दुटप्पी, स्वार्थी भूमिका घेणाऱ्या ‘वसंत’सेनेचा नाही. दुष्काळ महत्त्वाचा आहे, असे ‘वसंत’सेनेला वाटत आहे. चांगली गोष्ट आहे. त्यांचा एक लोकप्रतिनिधी दुष्काळी पुरंदर भागातूनच आलेला आहे. केवळ पवारविरोध हाच एककलमी कार्यक्रम राबवत त्याने स्वतःची निवडून येण्याची सोय लावून घेतलेली आहे. भारतमाता की जय, यापेक्षा दुष्काळ निवारणार्थ काही ठोस उपाययोजना करा, असा अनाहूत, न मागता सल्ला दिलाय. मग आमचेही काही प्रश्न आहेत. ज्यावेळी अयोध्येत श्रीराममंदिर उभारण्याचा प्रश्न 1990 च्या दशकात ऐरणीवर आला होता, त्यावेळी देशभरातील तथाकथित बुद्धीवादी मंदिराला करोडो रुपये खर्ची घालण्यापेक्षा गरिबांना रोजगार द्या, असे म्हणत असताना, बाळासाहेब ठाकरे यांनी काय भूमिका घेतली होती? श्रीराम हा आमचा श्वास आहे, ध्यास आहे. त्यामुळे अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिलेच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली नव्हती काय? अगदी परवापरवा पर्यंत केंद्रात भाजपा सरकारने जेव्हा वर्षपूर्ती केली त्यावेळी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणी का झाली नाही? हा प्रश्न याच मुखपत्रातून उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळीही राज्यात दुष्काळी परिस्थिती होती. रोजगाराचा प्रश्न तर स्वातंत्र्यप्राप्तीपासून प्रलंबित आहे. समस्यांना प्राधान्य अशी मुखपत्राची भूमिका असेल, तर चीन, पाकविरोधात ज्या लढाया लढल्या गेल्या, त्यांना विरोध का केला नाही? राष्ट्रहित नंतर, अगोदर ‘रोटी, कपडा और मकान,’ मिळाले पाहिजे, अशी मागणी का नाही हो केली? समस्यांबाबत तुम्ही आणि तुमचे पक्षप्रमुख काय बोलणार हो… गेल्या वर्षी नालेसफाईत हजारो कोटींचा जो गैरव्यवहार झाला, त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबई नेहमीप्रमाणेच तुंबली. यंदा कितीही मोठा पाऊस येऊ देत, माझा सर्वसामान्य मुंबईकर या पावसाचा मनमुराद आनंद लुटेल असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छातीठोकपणे सांगितले होते. पण मुंबई महानगरपालिकेचा पैसा खोटा ठरवत पाऊस पडायचा तेव्हढाच पडला, पण गटारे मात्र लगेचच तुंबली, मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. हाच का पावसाचा आनंद… दुष्काळ तर तसा तीन वर्षे राज्यात आहेच. तो असतानाही शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे, ही मागणी करणारे तुम्हीच होता ना… स्मारक नंतर बांधले तरी चालेल, पण एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, यासाठी आपण त्यावेळी काही बोलल्याचे आम्हाला आठवत नाही. त्याऊलट स्मारक समितीवर राष्ट्रवादीच्याच शरद पवार यांची वर्णी लावून आपण मोकळे झाला होतात. याच राष्ट्रवादीच्या, याच पवारांच्या पुतण्याने पाऊस न पडल्याने धरणात पाणी नाही, तर मग मी आता धरणात मुतू का? असा निलाजरा प्रश्न विचारलेला साऱ्या महाराष्ट्राने पाहिला होता. त्याकडे दुर्लक्ष करत आपण पवारांना बाळासाहेबांच्या स्मारक समितीवर कोणत्या निकषावर घेतलेत, सांगाल काय?
पाऊस पडलाच नव्हता. मग पाकी गायक गुलामअली यांचा मुंबईत कार्यक्रम होऊ देणार नाही, असे सांगत तो उधळून (?) लावण्यात आपण धन्यता मानली म्हणे. येऊ द्यायचे होते गुलामअली यांना मुंबईत. राष्ट्रहित, राष्ट्राभिमान यापेक्षा दुष्काळ महत्त्वाचा असेल, तर त्यावेळी आपण त्यांच्या विरोधात भूमिका का घेतली? सेनेवर आमचे जवान पाकविरोधात रक्त सांडत असताना, शहीद होत असतील तर पाकी कलावंत हिंदुस्थानात येता कामा नयेत, असा आपला दावा होता. त्याच जवानांचा विचार केला, तर सेनेवरील प्रत्येक जवान आजही सीमांचे प्रामाणिकपणे रक्षण करत आहे. त्या सर्वांचे कुटुंबिय काय सुखवस्तू आहेत काय? त्यांची गावाकडे शेतीवाडी नाही? खड्ड्यात गेली नोकरी, गावाकडे जाऊ, शेती पाहू, घरादाराला पाणी कसे मिळेल ते पाहू, त्याचबरोबर गावाचीही तहान भागवण्यासाठी जोर लावू, असे म्हणत हे जवान गावाकडे परत आले तर तुमच्याच म्हणण्याप्रमाणे बिघडले कुठे…
wp-1457115404946.jpegउद्धव ठाकरे तुमचे कसे आहे माहिती आहे का, एकत्र नांदायचे नाही, पण तुमचे हात दगडाखाली आहेत, तुमच्या ज्या दगडधोंड्यांना मोदी लाटेत विजयाचा शेंदूर लागला, त्या दगडांची तुम्हाला काळजी आहे. म्हणून तुम्ही अधिकृतपणे काडीमोड घेतलेला नाहीय्ये. सत्तेत असूनही सत्तेमुळे जी अमर्याद ताकद (पॉवर) मिळते, ती तुम्हाला मिळालेली नाही, त्यामुळे तुम्ही सत्तेशिवाय तळमळत आहात. तुमची तळमळ ही सत्तेसाठीची आहे, सामान्यांसाठीची नाही. तुमचे दुःख दुष्काळाचे नाही, तर सत्तेची मलई न मिळाल्याचे आहे. जसे तुम्ही सवडीनुसार हिंदुत्व आणि मुंबईत सोयीनुसार मराठी माणूस हाताला घेता, तसा भाजपाला विरोध करायचा म्हणून आता तुम्ही दुष्काळावर बोलताय. ज्या पाकी दाऊदच्या मुलीचा निकाह कुख्यात दाऊदच्या मुलाशी होणार होता, त्याने मातोश्रीवर माथा टेकवताच, तो तुमच्यासाठी पवित्र झाला होता. याच दाऊदने मुंबईत घडवून आणलेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या मालिकेत हजारोंचे बळी घेतले, याचे त्यावेळी तुम्हाला सोयीस्कररित्या विस्मरण झाले होते, आम्हाला नाही ना झाले. पाश्चात्य संस्कृतीच्या नावाने खडे फोडता फोडता तुमचा घसा सुकला. पण मायकल जॅक्सन तुमच्याकडे मुक्कामाला येतो काय, त्याने कोणते शौचालय वापरले, याचे छायाचित्र तेव्हढे प्रसिद्ध करायचे तुमच्या याच मुखपत्राने बाकी ठेवले होते. तुमचा गेल्या वर्षीचा नालेसफाईचा कोट्यवधींचा गैरव्यवहार अजूनही पुरता उघडकीस आलेला नाही. नेमका मलिदा खाल्ला कोणी हे उघडकीस आलेले नाही. तशातच आता हजारो कोटींचा मोबाईल टॉवरचा घोटाळा आजच उघड झाला आहे. मुंबई महापालिकेने जेथे तुमच्या पक्षाचा ध्वज फडकत आहे, त्याच पालिकेने केवळ एक रुपया दराने मोबाईल टॉवरसाठी जागा दिल्याचे तुमच्याच जुन्या मित्रांनी उघड केले आहे. त्याबाबत तुम्ही काय स्पष्टिकरण करणार आहात, सांगा की…
उद्धव ठाकरे, तुमचे कसे आहे माहिती आहे का, खायाची हाये कोंबडी, खिशात नाय दमडी…
भाजपाचे हिंदुत्व हे तुमच्यासारखे नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतमाती की जय बोलणारच, हे ठासून सांगितले आहे. तुम्हाला तसे सांगण्यापूर्वी मुंबईतील मराठी मते वगळता बाकी कोणकोणती मते राहिली आहेत, हे जाणून घेण्यात स्वारस्य असते. कारण मुंबईत मराठी माणूस उरलाय कुठे… म्हणूनच जे काही बिगरमराठी मतदार मुंबईत आहेत, त्यांना ओंजारत-गोंजारत तुम्हाला तुमची ‘दिशा’ ठरवावी लागते. कारण त्यावरच तुमची ‘दशा’ अवलंबून आहे. म्हणूनच सराफांच्या बंदमध्ये तुम्ही उडी घेतली आहे. तुम्हाला त्यात येत्या महापालिकेत मिळणारा सराफांचा टक्का दिसतो आहे. आम्ही मतांच्या टक्क्यांबाबत बोलत आहोत, हे इथेच स्पष्ट करतोय. कारण टक्का म्हटले की, तुम्हाला पालिकेतील निविदांमधील टक्केवारी कदाचित आठवेल, म्हणून स्पष्ट केले. तुमच्या माहितीकरता सांगतो. आपले छप्पन इंच छातीचे पंतप्रधान नुकतेच सौदी येथे गेले होते. तेथे हजारो मुस्लीम भगिनींनी त्यांचे स्वागत करताना भारतमाता की जय, ही घोषणा उत्स्फूर्तपणे दिली. हे भाजपाचे हिंदुत्व… खणखणीत… देवेंद्र फडणवीसही तसेच आहेत. त्यामुळे तुमची गैरसोय होते. राजकारण म्हटले की बेरीज वजाबाक्या आल्याच…. तुम्हाला सांगावे लागते हो. तुम्हाला राजकारणाचे ‘बाळकडू’ मिळालेले नाहीत ना… नांदत नसला तरी एका घरात राहताय, तेही भाजपाच्या हे चांगलेच लक्षात ठेवा. तुमचे कर्तृत्व तुम्ही अजूनही सिद्ध केलेले नाही, त्यामुळे आमच्यालेखी ते शून्य असेच आहे. मुंबई महापालिका तुम्ही स्वबळावर लढवणार आहात. ही पालिका सोन्याचे अंडे देणारी नव्हे तर तुमच्यासाठी ती सोन्याची खाणच आहे. या पालिकेतील हजारो कोटींचे घोटाळे आता बाहेर येऊ लागले आहेत. एकटे सराफ तुम्हाला तारणारे ठरू शकत नाहीत. त्यामुळे तुमची धडपड समजून येण्यासारखी आहे. मात्र, ही पालिका हातातून गेली तर काय… त्यामुळे आम्हाला काय म्हणायचे ते नीट म्हणजे नीटच समजून घ्या. भारतमाता की जय

संजीव ओक

युतीची पुनरावृत्ती?

wp-1457115536753.jpegश्री. रावसाहेब दानवे-पाटील,
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजपा
सस्नेह नमस्कार
केंद्रात तसेच महाराष्ट्रात भाजपा सरकार सत्तेत आले आहे. महाराष्ट्रात मित्र पक्ष शिवसेना हा भाजपाच्या विरोधात दंड थोपटून 2019च्या तयारीला लागला आहे. सेनेने 2014 विधानसभेसाठी मिशन 150+ हे उद्दिष्ट्य ठेवलेले होते. मात्र, लोकसभेत सेनेला जे यश मिळाले, ते त्यांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे याचा त्यांना विसर पडला, त्यामुळे ते आपल्याच कर्तृत्वावर मिळाले, अशा भ्रमात सेना नेतृत्व राहिल्यामुळे विधानसभेवेळी त्यांनी भाजपाची अडवणूक करणारे धोरण घेत, युती कशी होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. भाजपाला चर्चेच्या फेऱ्यात गुंतवून ठेवत त्यांनी मात्र स्वबळावर महाराष्ट्रातील जास्तीत जागा लढवण्याची तयारी केव्हाच केली होती. भाजपाचे नेते मात्र मित्र पक्षाची समजूत काढण्यात व्यस्त राहिल्याने त्यांना ‘शत-प्रतिशत’साठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र, भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत राज्यात सत्ता स्थापन केली. हा आता इतिहास झाला. वर्तमान काय आहे, याची जाणीव तुम्हाला व्हावी, त्यासाठीच हा पत्रप्रपंच.
wp-1457115404946.jpegशिवसेना केव्हाच 2019 साठी तयारीला लागली आहे. म्हणूनच त्यांनी गेल्या काही दिवसांत मंत्रीपद पदरात पडावे, यासाठी कोणतीही मागणी न करता, केवळ भाजपाला खिंडीत पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे आपल्या लक्षात आले असेलच. ज्या गावी सेनेची शाखाही नाही, तेथे त्यांनी संपर्क प्रमुख म्हणून कट्टर शिवसैनिकाची नेमणूक केलेली आहे. परिसरातील, तसेच गावपातळीवरील प्रत्येक राजकीय घटना ‘मातोश्री’वर कशी पोहोचेल, याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आलेली आहे. इंदापूर तालुक्यातील कुरवली गाव हे त्याचे प्रातिनिधीक उदाहरण ठरावे. या कुरवलीत सेनेची शाखाही नाही. केवळ येथील श्री. खरात हे शिवसैनिक असल्याने त्यांच्यावर इंदापूरची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आजही आपले मंत्री, आमदार, खासदार विजय साजरे करण्यातच मग्न असताना, सेना मात्र पुढील वेळी सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती कसा येईल, यासाठी सर्वतो प्रयत्न करताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा काय करते? हा प्रश्न अर्थातच महत्त्वाचा ठरतो. याच इंदापूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची बैठक दि. 24 फेब्रुवारी रोजी इंदापूर येथे आयोजित करण्यात आली होती. सकाळी 11 वाजता बैठक भरणार होती. प्रत्यक्षात पदाधिकारी बारा-साडेबारा वाजता आल्याने ती उशीरा सुरू झाली. ज्या इंदापूरात दोन दशकांपूर्वी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके भाजपाचे कार्यकर्ते होते, त्याच तालुक्यातून जवळपास शंभराच्या आसपास कार्यकर्ते बैठकीला हजर होते. यात युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. पोटतिडीकेने हे कार्यकर्ते काम करत आहेत. युवाशक्ती दिवस-रात्र न पाहता लोकहिताची कामे मार्गी कशी लागतील, याची काळजी घेत आहेत. हा अमूक पक्षाचा, तो अमूक पक्षाचा असा भेदाभेद न करता, सामान्यांची कामे ते करत आहेत. भाजपाला खऱ्या अर्थाने तळा-गाळापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य ते करत आहेत. इंदापूरचे माजी तालुकाध्यक्ष माऊली चवरे यांनी इंदापूर तालुका ढवळून काढत जे काम केले, त्याचे दृष्य परिणाम आता समोर येत आहेत. मात्र, पदाधिकारी काय करताहेत? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. पदाधिकारी पदांचे वाटप आपल्या हितसंबंधातील कार्यकर्त्यांना कसे होईल, याची काळजी घेताहेत. हा भाजपाचा नाही, त्याचे काम का करा? असा प्रश्न त्यांचा आहे. पदाधिकारी केवळ हितसंबंध जोपासत आहेत, तर कार्यकर्ते पक्षासाठी रक्ताचे पाणी करताहेत. सामान्य माणसाचे काम केले, त्याचे प्रश्न मार्गी लावले, तरच तो पक्षाशी जोडला जाईल, अशी युवा कार्यकर्त्यांची भावना आहे, ती अजिबात चुकीची नाही. ही बाब त्यांनी बैठकीत मांडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची मुस्कटबाजी केली गेली.
इंदापूर तालुक्यात येत्या महिन्यातच दुष्काळाचे संकट गडद होणार आहे. धरणात पाणी नाही. जनावरांना जगवायचे कसे, पिकांचे नियोजन कसे करायचे, चारा-पाणी कोठून आणायचा, त्याशिवाय आपण कसे जगायचे हा प्रश्न येथील शेतकरी बांधवांसमोर आहे. एक नाही, दोन नाही, तर तीन ते चार महिने ही परिस्थिती कायम राहणार आहे. किंबहूना मे महिन्यात ती कमालीची तीव्र झालेली असणार आहे. भाजपाचे स्वतःचे सरकार आता सत्तेवर आहे. त्यामुळे विरोधकांनी या प्रश्नांवरून सरकारची कोंडी करण्यापूर्वीच गावपातळीवरील चित्र संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. मात्र, आजही कार्यकारिणीत कोणाला घ्यायचे, कोणाला नाही, याचीच चर्चा होत असेल, तर सर्वच भाजपा नेत्यांनी आत्मचिंतन करायला हवे, अन्यथा ‘पार्टी विथ डिफरन्स,’ हे म्हणायचा नैतीक अधिकार भाजपाने गमावलेला असेल. युती सरकारच्या काळात ज्या चुका भाजपाकडून झाल्या, त्याचीच पुनरावृत्ती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालावधीत होत आहे का, हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.
पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांना खुर्चीचा गूण लागला का? हा प्रश्न आम्ही मागेही उपस्थित केला होता. बापट भाजपापेक्षा राष्ट्रवादीचे मंत्री असल्यासारखे वागतात. मात्र, अजित पवार यांचा प्रशासनावर धाक होता, वचक होता. सनदी अधिकारी अजित पवार यांच्यासमोर अक्षरशः थरथर कापायचे. इथे बापट यांना अधिकारी भीकही घालत नाहीत, असे विपरित चित्र आहे. आज भाजपाचे राज्यातच नव्हे तर केंद्रातही सरकार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्याने केलेला फोन असो वा नेत्याने, सामान्यांची कामे मार्गी लागणारा ठरला पाहिजे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
modi-11शासकीय योजना युती सरकारच्या काळातही सामान्यांपर्यंत पोहोचू दिल्या जात नव्हत्या. आताही त्या पोहोचलेल्या नाहीत. मुद्रा बँक ही नव्याने व्यवसाय करणाऱ्यांना विनासायास अल्पव्याजदरावर सहजासहजी भांडवल उभे करून देणारी योजना होय. भाजपाचे जे प्रवक्ते आहेत, त्यांना आम्ही वेळोवेळी ही योजना नेमकी काय आहे, तिचा फायदा कोणा-कोणाला होऊ शकतो याबाबतची माहिती द्यावी, यासाठी सुचवले. तसे संदेश त्यांना दिले. दुर्दैवाने प्रवक्तेही ही योजना काय आहे, याची माहिती देऊ शकले नाहीत. प्रवक्ते उदासीन आहेत, का नेमके काय आहे, याचा खुलासा व्हायला हवा. मुद्रा बँक ही रोजगार देणारी, रोजगाराला चालना देणारी योजना आहे. विरोधक आज भाजपाने किती जणांना रोजगार दिला, यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करताहेत. मुद्रा बँकेची प्रभावी अंमलबजावणी झाली असेल, त्याची आकडेवारी उपलब्ध असेल, तर विरोधकांच्या आरोपातील हवा एका क्षणात काढून घेता येते.
इंदापूरचे उदाहरण प्रातिनिधीक आहे. जवळपास सर्वच तालुक्यात हेच चित्र आहे. पालकमंत्री पुरेसा वेळ देत नाहीत. कामे होत नाहीत. अधिकारी जुमानत नाहीत. सरकार सत्तेत असूनही कामे होण्यासाठी रास्ता रोको करावा लागतोय. एक ना अनेक. किती तक्रारींचा पाढा वाचायचा.
प्रत्येक आमदाराने एक गाव दत्तक घ्यावे, अशी कल्पना माऊली चवरे यांनी मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना त्यासाठीच्या सूचना केल्या आहेतच. त्याच धर्तीवर भाजपा आमदारांनी गावे दत्तक घेऊन, त्यांचा विकास कसा होईल, त्यासाठी निधीचा विनियोग केल्यास, पालकमंत्री काम करत नाहीत, ऐकत नाहीत, ही तक्रारच राहणार नाही. तसेच पालकमंत्र्यांची गरजही भासणार नाही.
इंदापूरात अतूल तेरखेडकर हे भाजपाचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. अवघ्या चार ते पाच कार्यकर्त्यांना सोबत घेत, इंदापूरात भाजपाचे आव्हान काँग्रेससमोर त्यांनी जिवंत ठेवले होते. भाजपा हा काँग्रेसी गवतासारखा कडवटपणे पसरलेला नाही. संघाच्या विचारधारेतून पुढे आलेल्या कार्यकर्त्यांनी तो वाढवलेला आहे. पदाची अपेक्षा न ठेवता, त्यांनी कार्य केले. आजही करताहेत. अन्य पक्षात पद म्हणजेच सर्वकाही, असे असताना भाजपात पद म्हणजे जबाबदारी असे आजही मानले जाते. मानचिन्ह मिरवल्यासारखे ते मिरवले जात नाही, तर त्या पदाला साजेलसे काम आपल्याकडून कसे होईल, यासाठीच तो कार्यकर्ता राबताना दिसून येतो. मात्र, कार्यकर्त्यालाही पोट असते. याची जाणीव भाजपाच्या नेत्यांनी ठेवायला हवी. कार्यकर्ता जगला, तर पक्ष जगेल, वाढेल. सन्मानाने जगणाच्या मार्ग भाजपाच देतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही दिवसातील 15 ते 16 तास अखंडितपणे देशकार्य करत आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. मात्र, भाजपा नेते वैयक्तीक कामांच्या नावावर थंड हवेची ठिकाणे असोत वा अन्य कोणती… तेथे सहकुटुंब फिरायला जाताना दिसून येतात. ज्यावेळी पुण्यात सेनेच्या दिवाकर रावते यांनी लादलेल्या हेल्मेटसक्तीवरून रान उठलेले असताना, पुण्यातील भाजपाचे आमदार भीमराव तापकीर हे मात्र चेन्नईत होते. चेन्नईत त्यांचे नेमके असे कोणते काम होते? सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नापेक्षा त्यांना चेन्नईवारी महत्त्वाची का वाटली? याचा खुलासा पक्ष नेतृत्वाने त्यांच्याकडून का घेतला नाही? असो.
वसईचे आमदार तसेच बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, तुम्ही प्रचाराला केव्हा सुरुवात करता? त्यावर हितेंद्र ठाकूर म्हणाले होते, माझा जाहीरनामा म्हणजे जनतेला दिलेली बोगस आश्वासने नसतात. मी आतापर्यंत काय काम केले, याचा दाखला त्यात असतो, तसेच निवडून आल्यानंतर काय करणार आहे, हेही त्यात दिलेले असते. त्यामुळे जेव्हा माझ्या विजयाची औपचारिक घोषणा होते, त्याचवेळी मी कामाला लागलेलो असतो. तोच माझा प्रचार असतो.
भाजपाचे लोकप्रतिनिधी असे कार्यमग्न राहून पक्षाचा प्रचार करणार आहेत, की ऐनवेळी जागे होणार आहेत? किमान मोदी यांचा आदर्श त्यांनी घ्यावा. 15 तास नाही जमले तरी 12 तास तरी जनतेसाठी द्यावेत, इतकीच अपेक्षा आहे. केंद्रात मोदी यांनी कितीही जनहितकारी योजना आणल्या, तरी त्या जर सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम देशभरातील भाजपा नेत्यांनी केले नाही, तर त्या योजनांना काहीही उपयोग होणार नाही.
तसदीबद्दल क्षमस्व

संजीव ओक

सेनेवर रिमोट कंट्रोल…

गेल्या  वर्षी लोकसभा निवडणुकीपासून भाजपा-शिवसेना यांच्यात छुपे युद्ध सुरू असले, तरी बहुमताने केंद्रात सत्ता मिळविलेल्या भाजपाने राज्यात सर्वाधिक जागा जिंकत ‘रिमोट कंट्रोल’ आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले असल्याचे नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकेकाळी काँग्रेसच्या मदतीने राज्यात मोठ्या झालेल्या सेनेने पुन्हा एकदा हिंदुत्वाचे तुणतुणे वाजवायला सुरुवात केली. त्यासाठी कसुरीप्रकरणात सुधिंद्र कुळकर्णी यांच्या चेहर्‍याला सेनेने काळे फासले. मात्र, त्यावरून देशभरात सेनाविरोधात नाराजीचा सूर उमटला. पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेसाठी आयता मुद्दा सेनेने दिला, असा आरोप सर्वांनीच केला. आमचा राष्ट्रवाद भाजपाला पचत नसेल, तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, अशी राणा भिमदेवी थाटात घोषणा करणार्‍या सेनेने आपल्याच मुखपत्राची शाई वाळण्यापूर्वीच आम्ही राजिनामा देणार नाही, असे म्हणत घुमजाव केले. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सेनेवर ‘सत्तेसाठी गुळाच्या ढेपेला लागलेले मुंगळे,’ अशा शब्दांत तोफ डागताच सेनेचे नेतृत्व कमालीचे संतप्त झाले. त्यांनी आपल्या मुखपत्रातून पवार यांच्याविरोधात अतिशय खालच्या पातळीवर घसरत वैयक्तिक टिका केल्याने राज्यभरातून जुन्या जाणत्या नेत्यांसह कार्यकर्त्यांतही संतापाची भावना पसरली. मात्र, बारामती येथील कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उपस्थिती लावली असून, पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही शरद पवार यांच्या माळेगावातील कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. त्यातूनच भाजपा तसेच राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी सेनेला अप्रत्यक्ष इशारा दिल्याचेच स्पष्ट झाले आहे.  आपण भाजपाला पाठिंबा देणार नाही, असे पवार म्हणाले असले, तरी त्यांची भाजपाशी असलेली जवळीक नवी नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामती येथे पवारांच्या खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहत, पवारांसोबत ‘स्नेहभोजन’ केले होते. त्यावेळीही सेनेच्या काळजात धडकी भरली होती. एकीकडे सरकारविरोधात भूमिका घ्यायची, परंतु सत्तेमधून बाहेर पडायचे नाही, असे करून सत्तेचा रिमोट हाती रहावा, म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बरीच आदळआपट करून पाहिली. मात्र, राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या खमक्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने हा ‘रिमोट’ आपल्या हातीच कायम राखला आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांना अभय देणार का? असा प्रश्‍न विरोधकांनी विचारला होता. मात्र, अनेक बड्या नेत्यांची चौकशी सुरू असल्याने, आता तो आरोपही भाजपावर करता येत नाही. त्याचवेळी पवार आणि भाजपातील जवळीक कायम राहिली आहे. आता तर बारामतीचे गोडवे जेटली यांनी गायल्याने, सेनेच्या जळफळाटात आणखीनच भर पडणार आहे.  जागा वाटपावरून विधानसभेवेळी राज्यातील भाजपा-सेना युती सेनेने कमालीचे ताणल्याने तुटली होती. मात्र, त्यानंतर सत्तेसाठी तसेच राजकारणातील आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी सेना हिंदुत्वाचा झेंडा नाचवत सत्तेत सहभागी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत सेनेला उताणे पाडले होते. त्याचा राग मनात ठेवत, सेनेने कसुरी प्रकरणानंतर भाजपावर आगपाखड केली. मात्र, सत्तेतून बाहेर पडल्यास ती धजावली नाही. म्हणूनच पवारांनी ‘ढेपेला चिकटलेले मुंगळे’ अशी संभावना करताच हा वार मर्मी बसल्याने ‘घायाळ’सेनेने ‘हवा जाऊ द्या,’ म्हणत प्रत्यक्षात आपणच राजकीय वातावरण दुषित केले आहे, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. बारामतीत त्याचे संतप्त पडसाद उमटत असतानाच, भाजपाच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी येऊन ‘साहेबां’चे केलेले कौतुक एकीकडे राष्ट्रवादीला दिलासा देणारे, तर सेनेचा जळफळाट करणारे असेच ठरले आहे. दशकाहूनही अधिक काळ सत्तेशिवाय दूर राहिल्याने आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी सेनेला सत्तेत राहणे अपरिहार्य असेच आहे. सेनेची ही राजकीय अपरिहार्यता मात्र भाजपाच्या पथ्यावर पडणारी ठरली असून, सेनेने हिंदुत्वाच्या नावावर कितीही आखपाखड केली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘राष्ट्रवाद’ जगभरात नावाजला जात असल्याने, अनुल्लेखाने ‘मारणे’ म्हणजे काय, याचा शब्दशः अनुभव सेना रोज घेते आहे.

निवडणुकीपुरते हिंदुत्व

जी शिवसेना काँग्रेसच्या हाताला धरून मोठी झाली, ‘वसंत’सेना म्हणून ज्या सेनेला हिणवले जात होते, त्या सेनेने भाजपाला हिंदुत्वाचे धडे शिकवू नयेत. ज्या पाकी कलावंतांनी ‘मातोश्री’च्या पायर्‍यांवर माथा टेकला, त्यांना हिंदुस्थानात कार्यक्रम सादर करण्याचा परवाना मिळतो. ‘मायकल जॅक्सनने कोणते बाथरूम वापरले,’ याची बातमी मुखपत्रात होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत करणारा, व त्याच कारणांवरून शिक्षा भोगत असलेला संजय दत्त ‘मातोश्री’ला भेट देताच, तो गुणी बाळ ठरतो. त्यामुळे सवडीसाठी हिंदुत्व, अशी भूमिका घेणार्‍यांनी भाजपाला त्यासाठीचे उपदेशामृत पाजू नये. सव्वाशे वर्षांपासून कोणताही गाजावाजा न करता ज्या संघ परिवाराने संपूर्ण देशात आपले कार्य अखंडितपणे सुरू ठेवले आहे, त्याच संघाच्या मुशीतून तावून सुलाखून भाजपा कार्यकर्ते तयार होतात. त्यामुळे सेनेने आपल्यापुरते पहावे, अशी भाजपा कार्यकर्त्यांची भावना आहे.