पहिली उचल तीन हजारच

चालू गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये मिळावी, अशी मागणी करतानाच खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे शुक्रवारी sugar_caneझालेल्या ऊस परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्हा ही शेतकऱ्यांची युद्धभूमी ठरेल, असे घोषित केले. त्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांना कराड येथे येण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सभेत लक्ष्य करण्यात आले. त्याचवेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘राजमत’शी बोलताना शरद पवारांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टिका करत, आंदोलन साताऱ्यातील कऱ्हाड येथेच का, हे स्पष्ट केले.

परिषदेला जमलेल्या लाखो शेतकऱ्यांना खासदार शेट्टी पहिली उचल किती जाहीर करणार याची उत्कंठा लागून राहिली होती. या वर्षी उसाला पहिली उचल साखर कारखानदारांनी जाहीर करावी, यासाठी संधी दिली होती. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करूनही कारखानदार याविषयी बोलण्यास तयार नाहीत. गतवर्षी २६०० रुपये पहिली उचल दिली. यंदा कृषिमूल्य आयोगाने ऊस उत्पादन खर्चात केलेली ४०० रुपयांची वाढ गृहीत धरून आगामी गळीत हंगामासाठी प्रतिटन ३ हजार रुपये पहिली उचल द्यावी, अशी आमची मागणी आहे. ही मान्य होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा देतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चर्चेचे दरवाजे बंद नसल्याचे खा. राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शरद पवार यांनी नुकतेच बारामती तालुक्यातील माळेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या दरात घसरण झाल्याने साखर कारखानदार अडचणीत आले आहेत, असे सांगत, यंदाच्या वर्षी उसाला जास्तीचा दर देता येणार नाही, असे संकेतच दिले होते. त्याचवेळी माळेगावातीलच अन्य एका कार्यक्रमात बोलताना, शेतकऱ्यांच्या मालाला, चांगला दर मिळालाच पाहिजे. कांदा महाग झाला की, कृषिमंत्री या नात्याने त्याचे खापर माझ्या माथी फोडले जाते. मात्र, शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा फायदा मिळालाच पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे जाहीर केले होते. एकीकडे पवार शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेतात. मात्र, उसाचा प्रश्न आला की, ते सोयिस्करपणे कारखानदारांची बाजू का घेतात, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Raju-shettyऊस उत्पादक शेतकऱ्यांचा लढय़ाचा कार्यक्रम जाहीर करताना खासदार शेट्टी म्हणाले, गत हंगामात इंदापूर व वसगडे येथे दोन शेतकऱ्यांना आंदोलनावेळी झालेल्या पोलीस गोळीबारात जीव गमवावा लागला होता. १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या गावी आदरांजली मेळावा घेतला जाणार आहे. तेथे आपण व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत लढय़ाची दिशा स्पष्ट करू. १५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या कराड नगरीमध्ये शेतकऱ्यांना जमण्याचे आवाहन त्यांनी केले.

सहकारी साखर कारखानदारी समृद्ध झाल्याचे स्वप्न यशवंतरावांनी पाहिले होते, पण त्यांच्या वारसदारांनी साखर कारखाने घशात घालून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. शेतकऱ्यांना वाचवा, त्यांना मुक्ती-न्याय द्या अशी साद या दिवशी मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घातली जाणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. गाळप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर साखरेचे भाव राज्यकर्त्यांकडून कृत्रिमरीत्या पाडले जातात, असा आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केला. साखर कारखाना विक्रीमध्ये ७०० कोटींचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी आपल्यापासून करावी. कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आपली तयारी असल्याचे सांगत त्यांनी तासगावचा साखर कारखाना चालविण्यास देण्याचे आवाहन आर. आर. पाटील यांना केले.

भाजपानेही यंदा ऊस दर आंदोलनात शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. साखर कारखाने अडचणीत, तर शेतकरी अडचणीत म्हणून आजवर साखर कारखान्यांना हजारो कोटींचा निधी देण्यात आला आहे. मग, आता ‘तुमचे तुम्ही बघा’ ही शासनाची भूमिका चुकीची असल्याचे नमूद करून, साखरेचे दर २,६०० रुपयांपर्यंत खाली आले असले, तरी साखरेबरोबरच सहवीज व मद्यार्कनिर्मितीसह अन्य माध्यमांतून मिळणा-या उत्पन्नातून चांगला दर देणे शक्य असल्याचे मत भाजपाचे विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

sadabhau_khotस्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांनी ‘राजमत’शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही एकंदरितच देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेच्या दराचा अभ्यास करून तीन हजार रुपयांची मागणी केली आहे. मुळामध्ये सरकार शेतकऱ्याशी संबंधित कोणताही प्रश्न असला की, चर्चेचे दरवाजे बंद ठेवते. कांद्याबाबतही तेच चित्र अनुभवण्यास मिळाले. केवळ वेळ मारून नेण्यासाठी सरकार चर्चा करते, असा आरोप करून खोत म्हणाले, सरकार काही वेळा चर्चा करते, परंतु त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. कापूस असो वा कांदा… शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे पैसे मिळतच नाहीत. त्याचवेळी शेतकरी आंदोलन करण्यासाठी उभाच राहू नये, यासाठी त्याच्यावर खोटी कलमे लावून त्याच्यावर बोगस केसेस दाखल केल्या जातात. आयुष्यभर आंदोलक शेतकरी न्यायालयात खेटा मारत राहतो. आंदोलन संपविण्यासाठी सरकारचे हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी लोकशाही आता फक्त मतदानावेळी बोटाला लावतात, त्या शाईच्या ठिपक्याएवढीच उरली आहे, बाकी सगळी ठोकशाहीच असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण हे शेतकऱ्यांना न्याय देणार आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित करून सदाभाऊ खोत म्हणाले, शेजारील कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी चर्चा करतो. त्यांना न्याय मिळेल, यासाठी प्रयत्न करतो. गुजरात राज्यातही सकारात्मक चित्र पहायला मिळते. तेथील कारखाने केवळ साखर एके साखर न करता, अन्य प्रकल्पही राबवत असल्याने लांबून तोड केलेल्या उसालाही ते साडे तीन हजार इतका दर देतात. मग आपल्याकडेच शेतकऱ्यांना दरासाठी रस्त्यावर का यावे लागते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आपल्याकडे याचा अभ्यास करण्यासाठी कोणालाही वेळ नाही. सहकार खात्याचा मंत्री असो वा कुणी अधिकारी… सगळे नामधारी असून, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी कोणालाही स्वारस्य नाही. मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसेल, तर ते नेमके वेळ कोणाला देतात, राज्य कोणासाठी चालवतात, याचा जाब विचारायला हवा, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सहकारखात्यावरही निशाणा साधला. कारखानदारच सरकारमध्ये आहेत. कारखानदारच आमदार आहेत. तेच जिल्हा बँकेवर आहेत. सहकारी बँकांच्या शिखर समितीवर आहेत. मंत्रिमंडळातही कारखानदार आहेत. मंत्रिमंडळ ही सोनेरी लुटारू टोळी आहे. त्यामुळेच येथील सर्वसामान्य जनता जीव मुठीत धरून जगत आहे. जनतेच्या मनात प्रश्न आहे, न्याय मागायचा तरी कोणाकडे… दरोडेखोरच न्यायदानाचे काम करणार, तेच शिक्षा ठोठावणार, त्याची अंमलबजावणीही करणार. असे चित्र असताना न्याय मिळेलच कसा, असा प्रश्न सदाभाऊ यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना झोपेतून जागे करण्यासाठीच कऱ्हाड हे आंदोलनाचा केंद्रबिंदू राहील, असे त्यांनी आंदोलनामागची दिशा ठरवताना स्पष्ट केले.

आर आर बारामतीचे दत्तकपुत्र

गृहमंत्री आर. आर. पाटील हे जन्माने शेतकरी आहेत. ते जेव्हा शेतकरी होते, तेव्हा सकाळचा डबा संध्याकाळीही पुरवून खात होते. आता ते बारामतीचे दत्तकपुत्र झाल्याने सोन्याच्या ताटात जेवत आहेत. त्यामुळे सकाळचा डबा आर. आर. विसरले आहेत. मात्र, ते एक विसरतात. सकाळचा डबा संध्याकाळी शिळा झाला, तरी तो आपल्या कष्टाचा असतो. कष्टाच्या भाजी-भाकरीत जी गोडी आहे, ती दुसऱ्याच्या ताटात वाढलेल्या पंचपक्क्वांनामध्ये नसते. यात आपला आत्मसन्मान राहत नाही, याची जाणीव आर. आर. पाटील यांना कुणी तरी करून द्यायला हवी, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी गृहमंत्र्यांचा समाचार घेतला.

तसे पाहिले तर गेल्या वर्षी राज्यात भीषण दुष्काळ पडल्याने उसाची लागवड तुलनात्मक कमी प्रमाणात झालेली आहे. कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाले असल्याने उसाची पळवापळव होणार, अशीच परिस्थिती सर्वत्र आहे. आडसाली उसामुळे बहुतांश कारखान्यांना गाळपासाठी ऊस उपलब्ध होत आहे. अन्यथा या कारखान्यांची धुराडीही पेटली नसती. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांना वाढीव दर मिळणे अपेक्षित असताना, रास्त दरासाठी त्यांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतो आहे. एकीकडे खासदार राजू शेट्टी यांनी हे आंदोलन यशस्वी करणारच, काय करायचे ते करा, अशा शब्दांत सरकारला इशारा दिला असताना, सरकारनेही हे आंदोलन चिरडण्यासाठी पुरेपूर तयारी केली आहे. गेल्यावेळी दुर्दैवाने आंदोलनात दोन बळी पडले. उसाला दर मिळाला, तरी त्याचा सल स्वाभिमानीच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी उसावरून शेतकऱ्यांना रस्त्यावर का उतरावे लागते, या प्रश्नाचे उत्तर स्वाभिमानीने दिलेले आहे. आम्हाला काय त्याचे या भावनेने या आंदोलनाकडे न पाहता, शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेणे गरजेचे आहे. उसाला एकरकमी मिळणारे पैसे कुणाला खुपत असले, तरी त्यासाठी त्याला पंधरा महिने किमान वाट पहावी लागते. दुसरे पिक घेता येत नाही. इतका विचार केला, तरी पुरे.

संजीव ओक

सनातनी आरोप

गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांनी न्यायालयीन यंत्रणांच्या धाटणीची भूमिका घेतलेली असून, ही प्रवृत्ती लोकशाहीला मारक आहे, तसेच ती मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत असल्याचे द्योतक आहे. आम्ही मागेही म्हटले होते, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांकडे पाहिले dr_dabholkarजाते. मात्र, हाच चौथा स्तंभ आता नैतिकतेच्या साऱ्या मर्यादा पार करून, राजरोसपणे सुपारी घेऊन लेखन करीत असल्याचे, अथवा वार्तांकने प्रसारित केल्याचे दुर्दैवी चित्र पाहण्यास मिळत आहे. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचे वृत्त सकाळपासून वाहिन्यांवर प्रसिद्ध होऊ लागले. त्याचदिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने आपल्या हाती पुरावे असल्याच्या थाटात, ही हत्या महात्मा गांधी यांची हत्या ज्या विचारसरणीने केली, त्यांच्याकडूनच करण्यात आल्याचे ऑन कॅमेरा सांगितले. लगेचच वाहिन्यांवरील वागळे सारख्या माकडांचे फावले. त्याच्या जोडीला राष्ट्रवादीचा ठाण्यातला गुंडा आव्हाडांचा जितेंद्र होताच. आव्हाड याचा थाट असा होता की, गुन्हेगाराची नावेच त्याच्यापाशी आहेत. सनातन या हिंदू संस्कृतीची जोपासना करणाऱ्या संस्थेला प्रसारमाध्यमांसह साऱ्यांनीच आरोपीच्या पिंजऱ्यात तातडीने उभे करीत, सनातन कशी धोकादायक आहे, असे व्यक्तव्य सुरू केले. कुत्रेही विचारत नसलेल्या समाजवाद्यांनीही या हत्येचे भांडवल करीत, सनातनसह हिंदू धर्मावर तोंडसुख घेतले. मात्र, आरोप करायला काहीही लागत नाही, हे ना माध्यमांनी समजून घेतले, ना माध्यमांनी. माध्यमांतून डॉ. दाभोळकर यांच्या नावाने गळे काढताना सगळ्यांनीच सनातन संस्थेच्या विरोधात भरभक्कम पुरावे हाती आहेत, तसेच ही हत्या ज्या दोघांनी केली, त्यांचे नाव-पत्तेही आपल्या हाती असल्याच्या थाटात, इतक्या वर्षांची मनातली मळमळ ओकत, सनातनच्या कार्याबद्दल किती आकस आहे, हेच दाखवून दिले.

आम्ही गेले काही दिवस म्हणूनच या घटनेवर काहीही भाष्य करण्याचे टाळले होते. याचा अर्थ आम्ही डॉ. दाभोळकर यांचा दहावा-बारावा केव्हा होतोय, याची वाट पाहत होतो, असा नव्हे. हत्येसारखी गंभीर घटना घडल्यावर तातडीने अकलेचे तारे तोडून नंतर मुखभंग करून घ्यायचा नसतो, इतके आम्हाला पक्के माहिती आहे. पत्रकारितेच्या परिभाषेत याला डेव्हलपिंग न्यूज म्हणतात. म्हणजेच, या घटनेला फाटे फुटू शकतात. त्याचे अनेक पैलू प्रकाशात येऊ शकतात. तपासातून अनपेक्षित असे काहीही निष्पन्न होऊ शकते. त्यामुळे संयतपणे घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करून ठोस निष्कर्ष काढायचा असतो. माध्यमांकडून सर्वसामान्यांकडून अपेक्षा असतात. त्यांचा अपेक्षाभंग होऊ नये, म्हणून सर्वच माध्यमांनी भान राखत वार्तांकने द्यावीत, असा दंडक आहे. आता आम्ही तो पाळतोय, म्हणून साऱ्यांनीच तो पाळावा, अशी अपेक्षा अर्थातच नाही. त्याचवेळी माध्यमांचा दुटप्पी चेहरा या निमित्ताने समोर आल्याने आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचा निप्पक्षपातीपणाचा मुखवटा टराटरा फाडायचे काम करावे लागणार आहे.

आजच्या तारखेपर्यंत पोलिसांकडे या हत्येबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. सीसीटीव्ही फुटेजवरील आरोपींचे चित्रिकरण अस्पष्ट असल्याने ते लंडन येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून, सुस्पष्ट कसे करता येईल, यासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्याबाबत ठोस काहीही सांगण्यात आलेले नाही. आजच्या तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा आहे की, तपास योग्य दिशेने सुरू असून, सीबीआय चौकशीची गरज नाही. पोलिस सक्षम आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता गृहखाते याबाबत अपयशी ठरले असल्याचे जाहीर कबुली देत, राष्ट्रवादीला घरचाच आहेर देता झाला आहे. यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांची काहीही प्रतिक्रिया नाही. नेहमीप्रमाणेच ते गडचिरोलीत शांतीची कबुतरे उडवत असल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी त्यांनी ज्या राष्ट्रवादीच्या लोंढे नावाच्या कार्यकर्त्याला आपल्या अधिकारात शस्त्राचा परवाना दिला होता, त्याने पुण्यात गोळीबार करून तिघांना जखमी केले. आता या लोंढेचा दौंडमधील कुख्यात आप्पा लोंढेशी काही संपर्क आहे का, याचा खुलासा पोलिसांकडून व्हायला हवा होता, तो झालेला नाही. आर. आर. यांच्या एका पीएचे नावही लोंढेच आहे, ते पुण्याचीच जबाबदारी पाहतात. त्यातूनच दौंडमधील सोनवणे बंधू दुहेरी खूनखटल्याचा मास्टर माईंड आप्पा लोंढे याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई का झाली नाही, या प्रश्नाचे उत्तर मिळते, असे म्हणायला जागा आहे. तसेच या खुनखटल्याबाबतही प्रसारमाध्यमांनी सोयिस्कररित्या मौन पाळले आहे. पुणे जिल्ह्यातील वाळू उपसा रक्तरंजीत करणाऱ्या या गंभीर दुहेरी खुनाचा तपास आप्पा लोंढेला त्यातून सहिसलामत बाहेर काढण्यासाठीच केला जातोय का, हा प्रश्न माध्यमांनी उपस्थित करायला हवा होता. मात्र, आप्पा लोंढे हा राष्ट्रवादीचा सक्रीय कार्यकर्ता असल्याने, तसेच दौंडमधील अजित पवार यांच्या मर्जीतील स्थानिक राष्ट्रवादीचा लोकप्रतिनिधीला आप्पा लोंढे रसद पुरवत असल्यानेही त्याच्यावर पोलिस विशेष मेहेरबान असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकाही माध्यमाने या आप्पा लोंढेचे साधे छायाचित्रही प्रकाशित करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही, हे विशेष. मुळात हा कुख्यात आप्पा लोंढे, ज्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई यापूर्वी झालेली असताना, त्याला सूट मिळेल, अशा पद्धतीने यवत पोलिसांनी या खूनप्रकरणी कलमे लावली. तसेच तो कर्नाटकात पळून गेल्याच्या वावड्या उडवून, त्याच्या संपर्कात राहत, त्याला तुळजापूर येथून अटक करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. प्रत्यक्षात तो संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात सातत्याने होता. मोक्का लावणार नाही, या अटी-शर्तीवर तो पोलिसांना शरण गेला असताना, त्याला शिताफीने अटक करण्यात आल्याचे चित्र याच माध्यमांनी रंगवले. सीआयडीमार्फत संबंधित सर्वांच्याच (स्थानिक पत्रककारांसह) मोबाईलवरील कॉल तपासून पाहिल्यास याला पुष्टी मिळेल. त्यानंतर दौंड येथे पालखीसोहळ्या दरम्यान हाच कुख्यात आप्पा लोंढे गळ्यात तुळशीची माळ घालून, बुक्का लावून वारकऱ्यांना जेवायला वाढत होता. याच्या बातम्या मात्र माध्यमांनी प्रसिद्ध केल्या. पुणे जिल्ह्यात घडलेल्या या हत्येला दोन वर्षे उलटून गेली, तरी पोलिसांसह साऱ्यांनीच त्याबाबत सोयिस्कर मौन पाळले आहे. निवडणुका जवळ आल्याने आप्पा लोंढेच्या रसदीची संबंधित लोकप्रतिनिधीला गरज असल्याने, त्याला मोकळे सोडले आहे का, हाही प्रश्न आहे. पुण्यातील गोळीबार लोंढे यानेच केल्याने, तसेच तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याने पुन्हा एकदा सोनवणे बंधू हत्याकांडाला उजाळा दिलेला नाही.

RR Patilकुख्यात आप्पा लोंढेचे उदाहरण देण्यामागे विशिष्ट कार्यकारणभाव आहे. गेल्या काही दिवसांतील वार्तांकनांवरून आमच्या मनात काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे गृहखात्याकडून मिळावित इतकीच अपेक्षा आहे. यातून डॉ. दाभोळकर यांची हत्या कोणी केली, याचे कोडे सुटण्यास मदत होईल. राष्ट्रवादीशी संबंधित गुन्हेगाराला कसे पाठीशी घातले जाते, याचे आप्पा लोंढे, तसेच पुण्यातील लोंढे याने केलेला गोळीबार हे प्रातिनिधीक उदाहरण आहे. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येशी सनातनच आहे, असा ठाम समज का करवून देण्यात आला? माध्यमांनी सातत्याने सनातनला रडारवर घेतल्यानंतर अखेर एका कार्यकर्त्याला गोवा येथून उचलण्यात आले. उचलण्यात आले हाच शब्दप्रयोग योग्य आहे. कारण त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नसताना केवळ संबंधितांचे समाधान व्हावे, हाच एकमेव हेतू त्यामागे असावा. माध्यमांनीही या अटकेला ठळकपणे पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली. मात्र दोनच दिवसांत पुराव्यांअभावी त्याची सुटका करण्यात आल्यावर, त्याबाबतचे वृत्त आतील पानावर देण्यात आले. त्याचवेळी पोलिसांनी एका मुस्लिमाला अटक केली, त्याचे नावही देण्याचे माध्यमांनी टाळले. का? तो सर्वच संबंधित संपादकांच्या नात्यातील आहे काय? का त्याचे नाव न छापण्याबद्दल काही पेट्या-खोकी त्यांना मिळाली? सनातनच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी पोलिसांनी एका कार्यकर्त्याला उचलले, तर पहिले पान – नाव, गाव, पत्त्यासह. मुस्लीम समाजाच्या आरोपीला उचलले, तर संशयिताला अटक, इतकाच उल्लेख. ही बाबही शंकेला जागा ठेवणारी.

मुळात एक साधी गोष्ट पोलिसांकडून दुर्लक्षित केली जात आहे काय, अशी शंका आहे. डॉ. दाभोळकर शनवारातील कार्यालयात नियमितपणे येत होते, असे नाही, असे अंनिसकडूनच स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच साधनाची पुण्यात दोन कार्यालये आहेत, असेही सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच ही पाळत ठेवून केलेली हत्या होऊ शकत नाही. कारण डॉ. दाभोळकर तेथे येणार आहेत, त्यासाठी ते मुंबईहून निघाले आहेत, हे केवळ अंनिसच्या संबंधितांनाच माहिती होते. त्यांचा मुंबईपासून पाठलाग झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. पुणे व मुंबई पोलिसांनी केलेल्या याबाबतच्या दाव्यात विसंगती होत्या. त्यामुळे ही शक्यताही फोल ठरते. आरोपी मुंबईहून आले, असे म्हणायला वाव आहे. कसे ते नंतर आम्ही सांगूच. अंनिसचा हा कायदा गेली काही वर्षे मंजूरीसाठी रखडलेला होता. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येनंतर तातडीने त्याचे विधेयकात रुपांतर करून तो राज्यात लागू करण्यात आला.

अंनिसला विदेशातून जो निधी मिळत होता, त्याचा हिशोब गेल्या दहा वर्षांत देण्यात आलेला नाही. या निधीचा दुरुपयोग झाला, असा आरोप होत आहे. तो झाला नसेल, तर हिशोब का देण्यात आला नाही? हिशोब देण्यात आलेला नसतानाही, प्रशासनाकडून अंनिसला कायदेशीर मार्गाने त्याबाबत विचारणा का गेली नाही? सामान्यांना इन्कमटॅक्स लगेचच नोटिसा बजावते, मग अंनिसलाच ही सूट का मिळाली? सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयितांचा परिसरात वावर असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनीच सांगितले आहे. म्हणजेच मारेकरी संस्थेतीलच आहेत, असे म्हटले, तर त्यात काय चूक आहे? अंनिसने डॉ. दाभोळकर यांची किंमत चुकवून हा वटहुकूम जारी करवून घेतला, असे म्हटले तर त्यात काही गैर आहे काय?

मुंब्र्यामधील धर्मांधांचा तारणहार, राष्ट्रवादीच्या नावाखाली ठाण्यात आपले गुंडाराज चालविणारा आव्हाड याचा आवेश पाहिला, तर त्याच्या खिशातही मारेकऱ्यांची नावे आहेत, असे ठामपणे म्हणता येते. जे रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेले आहे, ते मुंब्रा येथील मुस्लीम समाजातील युवकांशी साधर्म्य सांगणारे आहे. चेहऱ्याची ठेवण, त्याच धर्तीची आहे. काळी जादू करणाऱ्यांच्यात मुस्लीम समाजातील ‘बाबा’ जास्त संख्येने आहेत. त्यांच्या जाहिराती मुंबईतील लोकलमधून झळकत असतात. तसेच दोनच दिवसांपूर्वी एका मुस्लीम भोंदू बाबाने तावीजच्या नावाखाली एका तरुणीवर बलात्कार केला, हे उदाहरण ताजे. म्हणजेच या विधेयकाचा फटका (आता कायद्याचा) या बंगाली बाबांना बसणार, हे नक्की. त्यामुळे आव्हाडने मुंब्रा येथून दोघांना पुण्याला पाठवले, अशी शंका घेतली, तर त्यात काही चुकीचे आहे काय? तसे असेल, तर ते आतापर्यंत बांगलादेशात पोहोचलेही असतील.

काटेवाडीतल्या उंदरांनी ब्राह्मणांच्या विरोधात अतिशय टोकाची भूमिका घेतलेली आहे. ब्राह्मणांची हत्या करून, महिलांवर अत्याचार करावा, अशी विकृत योजना सांगलीतील येडेकराने आखली आहे. डॉ. दाभोळकर हे ब्राह्मण असल्याने, त्यांना या विधेयकाचे श्रेय मिळू नये, यासाठीच या येडेकराने हा खून केला, असे आम्ही ठामपणे म्हणू शकतो. त्याचे लेखन इतके विकृत असूनही त्याला अद्याप अटक का झालेली नाही, हा प्रश्न आम्ही गृहमंत्र्यांना विचारू इच्छितो. का तो केवळ सांगलीतील असल्याने त्याला अभय मिळाले आहे? का ही काटेवाडीतील ही पिलावळ टग्याने पाळलेली असल्याने, टग्याच्या सांगण्यावरून नेहमीप्रमाणेच आर. आर. यांनी या पिलावळीच्या वळवळीकडे दुर्लक्ष केले आहे? ब्राह्मणांच्याबद्दल अपशब्द तर वापरण्यात आलेले आहेच, त्याशिवाय सरळ-सरळ त्यांची हत्या करण्याचा कट या सांगलीतील येडेकराने आखला असताना, गृहखाते आणखी एक-दोन डझन खून होण्याची वाट पाहत आहे काय? हा काटेवाडीतल्या उंदरांनी जोपासलेला जाती-पातीचा वाद आपल्याला निवडून देईल, या भ्रमात पवार आणि पवार कंपनी आहे काय?

देशपातळीवरही आसारामबापू यांच्याविरोधातही आरोपांची राळ उडविण्यात येत आहे. बापूंच्या अश्लिल सीडी असल्याचे वृत्त पान एकवर प्रसिद्ध केल्यानंतर त्या वृत्ताची शाई वाळायच्या आतच, अशी कोणतीही सीडी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट करून माध्यमांना तोंडघशी पाडले आहे. असो. तो वेगळाच विषय आहे. आम्ही म्हटल्याप्रमाणे ही काँग्रेसी नीती आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ज्या संजीव भट्ट यांनी 2002 मधील गोध्रा जळीतानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या उत्स्फुर्त प्रतिक्रेयेबाबत मोदीच जबाबदार असल्याचे दाखले न्यायालयात दिले होते, ते बनावट असल्याचे न्यायालयात उघड झाले आहे. मात्र, हे वृत्तही आतील पानावर प्रकाशित होईल, याबाबत कोणताही संदेह नाही. माध्यमांनी आपली जबाबदारी ओळखून ती पार पाडावी. अन्यथा, प्रगत तंत्रज्ञानाच्या या ग्लोबल व्हिलेजमध्ये, तुम्ही कोंबडा कितीही झाकून ठेवला, तरी सूर्योदय होणार हे नक्कीच. स्मार्ट फोन, टॅब्लेटच्या माध्यमातून सत्य सामान्यांपर्यंत पोहोचत आहे. असत्याचा विजय क्षणिक असतो. सत्य हे चिरंतन आहे, याचे भान माध्यमांनी ठेवले, तरी पुरे. माध्यमांतील तथाकथित तज्ज्ञांना, सुज्ञांना अधिक सांगणे, न लगे.

संजीव ओक

 

राजकीय बळी…

अखेरीस मुंबईच्या पोलिस आयुक्तांना, पटनाईक यांना पदावरून हटविण्यात आले. त्यांना बढती दिली, अशी सारवासारव सरकारकडून केली गेली. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी काढलेला निषेध मोर्चा यशस्वी झाला, असे आता सगळ्यांनीच मान्य करून झाले. त्याचवेळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याही राजीनाम्याची मागणी अजूनही जोर धरून आहे. अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जागी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्याची वर्णी लागण्याची संकेत मिळत आहेत. (अजित पवार नव्हेत). गृहमंत्र्यांचा यात राजकीय बळी जात आहे, हे एकाही प्रसारमाध्यमातील राजकीय विश्लेषकाच्या लक्षात आलेले नाही, की लक्षात येऊनही ते न कळल्याचे सोंग आणत आहेत, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आम्ही म्हटल्याप्रमाणेच पटनाईक यांना पदावरून हटविण्यासाठी आर. आर. ऊर्फ आबा यांनी लगोलग शिफारस केली होती. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ती फेटाळून लावली होती. म्हणजेच गृहखाते सर्व निर्णय आपल्या मर्जीने घेऊ शकत नाही, असे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. राज यांच्या मोर्च्यानंतर पटनाईक यांना पदावरून हटविण्याला अखेर पृथ्वीराज चव्हाण यांनी होकार दिल्यानंतर त्यांच्याजागी सत्यपाल सिंग यांची वर्णी लागली, असे सर्व वृत्तपत्रांतून ठळक अक्षरात प्रसिद्ध झाले आहे. म्हणजेच पटनाईक यांना पदावरून दूर करण्यात गृहखात्याने विलंब नव्हता, याचाच अर्थ आर. आर. पाटील यांनी तात्काळ कारवाई केली होती, हे कोणीही समजून घेत नाहीय्ये.

गृहखात्याची सूत्रे आर. आर. यांच्याकडे असली, तरी त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसेल, तर हे पदही राष्ट्रपदी पदासारखेच नामधारी आहे, असे स्पष्ट संकेत पटनाईक प्रकरणावरून मिळत असताना, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आर. आर. यांच्याविरोधात ‘असमाधानकारक’ असा शेरा का मारला? या प्रश्नाचे उत्तर पवार यांनाच माहिती असावे. कारण राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांनी भुषविलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हाती कोणकोणती सत्तास्थाने आहेत, हे पवार यांनी नीट म्हणजे नीटच माहिती असणार. एकंदरित मुंबईतील धर्मांधांनी घातलेल्या उच्छादानंतर आर. आर. यांची उचलबांगडी करून राष्ट्रवादीही आपली प्रतिमा साफ ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचे उघड होत आहे.

जो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच गृहखात्याला नाही, किंवा त्यांनी घेतेलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्री करणार असतील, तर पटनाईक यांच्यावर कारवाई का केली नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा का मागितला जात नाहीय्ये, याचा खुलासा प्रसारमाध्यमातील तथाकथित राजकीय ‘पंडितां’नी करण्याची गरज तीव्र झालेली आहे. अन्यथा तेही आझमी याच्यासारखेच काँग्रेसी संस्कृतीशी इमान राखून आहेत, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आझमीने किमान स्पष्टपणे पटनाईक यांची बाजू घेत, राजविरोधात बांग देण्याचे धैर्य दाखवले. बातमीतून मुख्यमंत्र्यांमुळेच पटनाईक यांना संरक्षण मिळाल्याचे ठळकपणे अधोरेखित होत असूनही एकाही संपादकाला त्यावर भाष्य करावेसे वाटले नाही, अथवा त्याची दखल घ्यावी, असे वाटत नसेल, तर ते खरे अपराधी आहेत. मुंबईतील हिंसाचारातील खऱ्या आरोपीला ते पाठीशी घालत आहेत, असा स्पष्ट अर्थ त्यातून मिळत आहेत.

पटनाईक यांना पाठीशी घालण्यात पृथ्वीराज चव्हाण यांचाच हात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता, त्यांना बढती देणाऱ्या, तसेच सीएसटी हिंसाचाराचा ठपका मुख्यमंत्र्यांवर ठेवत, आम्ही त्यांचा राजीनामा मागत आहोत. ही मागणी उचलून धरण्याची कोणत्या प्रसारमाध्यमात नैतीक ताकद आहे काय?

अन्यथा, आर. आर. यांचा राजकीय बळी जात असलेले दिसत असूनही ते मुकाटपणे पाहणारे राजकीय पंडित हे आमच्यालेखी विकले गेलेले काँग्रेसी बोलके पोपट आहेत. आर. आर. पाटील यांचा दिला जात असणारा राजकीय बळी हे काँग्रेसी पापाचे आणखी एक फळ म्हणावे लागेल. इतकेच.

– संजीव ओक

महाराष्ट्रधर्म

महाराष्ट्रातले पोलिस खाते असेल, प्रसारमाध्यमे असतील, मराठी माणसे असतील यांच्याकडे वाकडा डोळा करून पाहण्याची हिंमत कोणाची झाली नाही पाहिजेल, एवढी ताकद दिसली पाहिजे. दोन दिवस पोलिस अधिकारी भेटत होते, मोर्चा कसा काढणार, म्हटले चालत.

मोर्चाला निघणार नाही, याकरिता प्रयत्न होत होता.

हे सगळे उद्योग अरुप पटनाईक यांच्याकडून होत होते.

पोलिस अधिकारीच सांगत होते, गाड्या अडवण्याच्या गोष्टी होतील, इतर काही प्रयत्न होतील.

होणार का, होणारही नाहीत, हा इतर भाग. लोकशाही मार्गाने निषेधही व्यक्त करायचा नाही का?

आपला मोर्चा शांततेत होणार हे माहित असताना परवानगी देत नाहीत. आणि त्यादिवशी रजा अकादमीच्या मोर्च्याला परवानगी देता?

ते आमचे आर. आर. पाटील… कायदा-सुव्यवस्था जो बिघडवेल, त्याला आम्ही बघून घेऊ. मग त्या दिवशी काय घातलं होतं, शेपूट?

एक सीमारेषा असते, आम्ही आजवर ती ओलांडली नाही, ओलांडणार नाही.

पोलिसांवर हात नाय टाकायचा.

पोलिसांचे मानसिक खच्चिकरण झाल्यावर सर्वसामान्य माणसांनी कुणाकडे जायचे? हे असे काय राज्य चालते?

आणि पोलिस कमिशनर त्यादिवशी अरुप पटनाईक जे गुन्हेगार पकडले होते, त्या अधिकाऱ्यांना बास्टर्ड म्हणतात, सोडून टाका म्हणून सांगतात.

गुन्हेगारांना सोडून टाका?

पोलिस भगिनींवर जे अत्याचार झाले, आतमध्ये खेचून खेचून मारले त्यांना. आमचे मराठी कॉन्स्टेबल मार खात होते, आदेश नाहीत?

हे सगळे होणार याची माहिती होती. चॉपर आहेत, रॉड आहेत. पूर्वकल्पना असतानाही डोळेझाक करता.

11 तारखेला जो मोर्चा आला होता, त्यांना काहीतरी टार्गेट तरी होते, आम्हाला काय करायचे होते, आम्ही आमचे टार्गेट पहिल्यांदाच डिक्लेअर केले होते, अरुप पटनाईक राजीनामा द्या, आर आर राजीनामा द्या. आम्ही काय इथे जाळपोळ करायला नाही आलो, तोडफोड करायला नाही आलो. करायची इच्छा पण नाही.

करायची तर कुणाची करू? आमच्याच मुंबईतील मराठी माणसांच्या? हे उद्योग करण्यासाठी हा मोर्चा काढलेला नाही.

पण राग कुठे व्यक्त करायचा? झालेला घटनेचा रागही व्यक्त करू देत नाहीत.

आणि म्हणे लोकशाही सांभाळा, ही लोकशाही अशी?

त्या रजा अकादमीच्या मोर्चाचा ट्रॅक रेकॉर्ड काढून बघा.

हा भडवा अझू आदमी..

ह्याने तिकडे जाऊन त्याने भडकावू भाषण दिले, नोटिसा मला बजावता?

ह्या आझमीने भडकावू भाषण दिले. दोन कॉन्स्टेबल्सना ठेचून जळत्या बसमध्ये टाकून दिले.

आणि मला परवानगी देत नाही तुम्ही?

हे सगळे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत.

त्या दिवशीच्या सगळ्या घटना घडल्यानंतर पासपोर्ट सापडलाय इथे बांगलादेशचा.

या इथेच सापडलाय.

सिंगल एऩ्ट्री पासपोर्ट आहे हा. भारतात येण्यासाठीचा, परत जाण्यासाठीचा नव्हे आणि जाताना हा फेकून दिला आहे.

हे असले असंख्य लोक महाराष्ट्रात येताहेत इकडे. त्यांचे इथे अड्डे झालेत आहेत इथे महाराष्ट्रात.

मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. सगळे योगायोग इथेच कसे.

92मध्ये जेव्हा बाबरी पडली, त्याची प्रतिक्रिया कुठे उमटली? मुंबईत? अख्या देशभरात त्याची प्रतिक्रिया नाही उमटली, मुंबईत उमटली.

परवा अकरा तारखेला जो काही मोर्चा घडला, जो काही धुडघूस घातला गेला. उत्तर प्रदेशात जे काही घडले, त्याची प्रतिक्रिया मुंबईत घडली.

दुसरी राज्ये नाहीत काय?

अख्या उत्तर प्रदेशातमध्ये, बिहार, झारखंड मध्ये पाकिस्तान्यांवाल्यांचे आणि बांगलादेशवाल्यांचे जे अड्डे झाले आहेत, त्यातून ट्रेन भरभरून लोंढे इथे येताहेत, त्यांचा त्रास आपल्याला भविष्यात होणार आहे.

अबु आझमी दोन दोन मतदारसंघातून निवडून कसा येतो?

राज्यातला कोणताही राजकारणी दाखवा मला, दोन मतदारसंघातून निवडून येणारा.

जे बाहेरून आलेत, ते मतदान करतात याला. म्हणूनच तो निवडून येतो.

पोलिसांना कारवाई लागली. त्यात एक दंगलखोर मेल. अबू आझमीने त्याच्या कुटुंबियांना दीड लाख दिले. मग जखमी पोलिसांना का नाही दिले?

राज्य सरकारकडूनही अजूनही काही घोषणा झालेली नाही,

नुकसान भरपाईची घोषणा नाही, नुसता मार खा…

काही मागचा पुढचा विचार नाही, कसलाही विचार करायचा नाही.

कोणीही येते, आमच्या पोलिसांना मारायला लागतो.

ते पाकिस्तानातले मुसलमान किंवा बांगलादेशातले मुसलमान.

उत्तर प्रदेशात गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना केली. सगळ्यांनी पाहिले. पिक्चर पाहिले, टीव्हीवर पाहिले.

कुठे गेल्या मायावती? कुठे गेला तो रामदास आठवले? कुठे गेले रा. सु. गवई, प्रकाश आंबेडकर? का तोंडे बंद ठेवली?

च्यायला अंगात आल्यासारखं एकच घेऊन बसायचं, इंदू मिल, इंदू मिल….

काय इंदू मिलमध्ये बांधायचं आहे? बंगला? का आता नाही बोलत?

आता कोणी काही बोलणार नाही. घटना घडून इतके दिवस झाले. कोणाचे काही स्टेटमेंट नाही. इथे सगळे चिडिचूप.

ते मुंबई कमिशनर, त्यांचे एक फेव्हरेट. ढोबळे. त्या दिवशी अमर ज्यूस सेंटरमध्ये गेले. हॉकी घेऊन गेले. निरपरध्यांना मारहाण केली. काय तर म्हणे ड्रग्ज सापडले. मग बंद का नाही केले?

ते मुर्ख कमिशनर सांगताहेत, हॉकी खेळायला गेले होते, जाता जाता घेऊन हॉकी गेले होते.

उद्या कोणी हनिमूनला गेले असेल, जाताना काय तसाच जातो काय?

यांची पाठराखण करणार, कारण हे यांचे फेव्हरेट…

आणि ज्यावेळी इथे पोलिस आदेशाची वाट पाहत होते, फायरिंगची नव्हे किमान लाठीचार्चचा तरी आदेश द्या, त्यावेळी काहीच बोलले नाहीत.

आणि ज्यावेळी आमचे पोलिस अधिकारी कारवाई करत होते, त्यावेळी त्यांना तुम्ही शिव्या देता, बास्टर्ड म्हणता तुम्ही?

मला आर. आर. पाटील, अरुप पटनाईक यांना एवढेच सांगायचे आहे. थोडीशी लाज उरली असेल, तर राजीनामा देऊन मोकळे व्हा.

गेल्या दोन दिवसांपासून वर्तमानपत्रातून सुरू झाले होते. राज ठाकरे यांची नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाकडे…

पोलिसांवर हात टाकणारा, तो कोणत्याही धर्माचा असला, तरी त्याला तिथल्या तिथे फोडून काढला पाहिजे.

हा कोणत्या धर्माचा विषय नाही. जे पोलिस अधिकारी होते, ज्या माझ्या भगिनी होत्या, ते सगळे मराठी बांधव होते, त्यांच्यासाठी मी इथे आज रस्त्यावरती आलोय. त्या दिवशीचा मोर्चा मुसलमानांनी काढला. त्याचा निषेध मोर्चा मी इथे काढला.

लगेच हिंदूत्वाकडे?

राज ठाकरेला एकच धर्म समजतो. फक्त महाराष्ट्र धर्म समजतो. त्याशिवाय दुसरा धर्म समजत नाही. याच्या वाट्याला कोणी जायचे नाही. या असल्या लोकांची महाराष्ट्राकडे वाकडा डोळा करून बघायची हिंमत होता कामा नये. यासाठी हा मोर्चा आहे.

हा मोर्चा फक्त सर्व पोलिसांसाठी, त्यांचे मनोधैर्य काढण्यासाठी. त्यांना पाठिंबा देण्यासाठी. त्यासाठीचा हा मोर्चा आपण इथे काढला. जेव्हा अशा घटना घडतील तेव्हा याच ताकदीने उभे राहायचे आहे. मी जेव्हा केव्हा तुम्हाला हाक देईल, तेव्हा तुमचा मला असाच पाठिंबा राहील, अशी आशा करतो.

या मोर्च्याला तुम्हा सगळ्यांनी जो उदंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल धन्यवाद.

– राज ठाकरे

 भाषण झाल्यावर कॉन्स्टेबल प्रमोद तावडे या पोलिसाने व्यासपिठावर जाऊन राज ठाकरे यांना गुलाबपुष्प भेट दिले.त्यानंतर बोलताना तावडे म्हणाले, की मला कारवाईची भीती नाही. मी स्वयंस्फूर्तीने हे पाऊल उचलले आहे. राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी मी व्यासपिठावर आलो होतो. (तावडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला कोठडीत घेतले आहे.)